CAA : पाथरी तहसील कार्यालयावर ‘भाकप’च्या वतीने मोर्चा काढून धरणे आंदोलन

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी तहसील कार्यालयावर भाकपच्या वतीने मोर्चा काढून तहसील आवारातील मुख्य प्रवेशद्वारावर काही काळ धरणे आंदोलन करण्यात आले. नागरिकत्व कायद्याविरोधात गुरुवार (19 डिसेंबर) रोजी मार्केट कमिटी पाथरी येथून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या प्रमाणात लोकांनी आपला सहभाग नोंदवला.

नागरिकत्व कायद्याविरोधात गुरुवारी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन देण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर, पाथरी तालुका सेक्रेटरी कॉम्रेड ज्ञानेश्वर काळे, कॉम्रेड शेख बडे सहाब आदींसह पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकत्व कायदा सरकारला पाठीमागे घेण्यास भाग पाडू. नागरिकत्व संशोधन विधेयक हे भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणारा कायदा असल्याचे ते म्हणाले. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले

कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर कडाडून टीका केली. यावेळी मोदी, शहा, भारतीय जनता पक्ष यांच्याविरुद्ध घोषणाबाजी देण्यात आली. आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला होता. मार्केट कमिटी पाथरी येथून सेलू करणार होत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आंदोलकांच्या वतीने तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदन नायब तहसीलदार संदिप साखरे यांनी स्विकारले.

यावेळी कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक के.बी. बोधगिरे, पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर मनोज आहिरे यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. आंदोलकांच्या वतीने शांततेत आंदोलन पार पडले.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/