महाआघाडीसाठी ‘सीपीएम’चाही ‘लाल झेंडा’- काँग्रेसला जोरदार धक्का

नवी दिल्ली: वृत्तसंस्था 
भारतीय कम्युनिष्ट पक्षाने (सीपीएम) काँग्रेससोबत कुठलीही आघाडी करायला नकार दिल्याने काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे.  पक्षाच्या दिल्लीत झालेल्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीआधी कांग्रेससोबत आघाडी करणार नाही. निवडणुकीनंतर विचार करू असं पक्षानं मंगळवारी जाहीर केलं. दरम्यान भाजपला रोखण्यासाठी महाआघाडी तयार करण्यात्या काँग्रेसच्या प्रयत्नांना जोरदार फटका बसला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5ec4cdd3-cbe7-11e8-90f1-a7e43d427bc4′]
एप्रिल महिन्यात पक्षाचं महाअधिवेशन होणार आहे. आणि त्याच दरम्यान निवडणुकाही होणार आहेत. पण काँग्रेस सोबत न जाण्यावर पक्ष ठाम आहे. सीएमची तीन दिवसांची पॉलिट ब्युरोची बैठक मंगळवारी संपली. सर्व मुद्यांचा बैठकीत विचार करण्यात आला आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं पक्षानं म्हटलं आहे. निवडणुकीनंतर सर्व पर्याय खुले राहतील असंही पक्षानं जाहीर केलंय.

[amazon_link asins=’B073WX582T,B07DFPG3NH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6a44d5ec-cbe7-11e8-be8b-13f85c522e52′]
बसपा आणि सपाने काँग्रेससोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मायावती यांनी तर काँग्रेस अहंकारी असल्याचा आरोप केलाय. प्रादेशिक पक्षांना काँग्रेस महत्व देत नसल्याचं सांगत त्यांनीही महाआघाडीची शक्यता फेटाळून लावली होती. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्या निवडणुकांसाठीही महाआघाडी होऊ शकली नाही.

मुख्यमंत्री घेणार मराठवाड्यातील दुष्काळाचा औरंगाबादमध्ये आढावा


फक्त काँग्रेसने भाजपला रोखणं सध्याच्या राजकीय स्थितीत शक्य नाही. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र प्रत्येक प्रादेशिक पक्षाचं स्थानिक राजकारण हे वेगळं असल्याने महाआघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता दिसत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महाआघाडीची शक्यता फेटाळून लावली होती.