‘या’ पध्दतीनं करा 12 सरकारी कंपन्यांद्वारे ‘भरघोस’ कमाई, गुंतवावे लागतील फक्त 5000 रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राईज ट्रेडेड फंड (CPSE ETF) अंतर्गत 31 जानेवारीपासून किरकोळ गुंतवणूकदारांसाठी फर्दर फंड ऑफर (FFO) खुली केली जाणार आहे. ETF एक प्रकारचा म्युचुअल फंड आहे ज्याची युनिट स्टॉक एक्सेचेंजवर खरेदी-विक्री केली जाते. हा फंड हाऊसकडून ट्रेडिंग अकाऊंटद्वारे विकला किंवा खरेदी केला जातो. मार्च 2014 मध्ये लाँच झाल्यानंतर सीपीएसई ईटीएफ चा हा सातवा ट्रांच आहे.

12 सरकारी कंपन्यांचा समावेश
सीपीएसई ईटीएफ मध्ये 12 पब्लिक सेक्टर कंपन्यांचा समावेश आहे. यात जास्त करून एनर्जी आणि पावर सेक्टरमधील कंपन्या आहेत. 23 जानेवारी पर्यंत गेल्या एक, तीन आणि पाच वर्षांमध्ये त्यांचा कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट क्रमश: -6.36 टक्के, -6.35 टक्के आणि -2.59 टक्के राहिला आहे. यात ONGC, NTPC, कोल इंडिया, इंडियन ऑईल, REC, PFC, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ऑईल इंडिया, NBCC इंडिया, NCL इंडिया आणि SJVN यांसारख्या कंपन्या आहेत. या कंपन्यांना इंडेक्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत वेटेज आहे.

मिळणार 3 टक्क्यांची सवलत
प्रत्येक CPSE ट्रांच डिस्काऊंटसोबत येतो, जो किरकोळ गुंतवणूकदारांसाटी 3-5 टक्क्यांच्या जवळपास असतो. वर्तमानकाळात या सातव्या ट्रांचसाठी गुंतवणूकदारांना 3 टक्क्यांचा डिस्काऊंट मिळणार आहे. हा डिस्काऊंट रेफरंस प्राईजच्या आधारावर असणार आहे. या डिस्काऊंटचा लाभ घेण्यासाठी बहुत करून संस्थात्मक गुंतवणूकदारच गुंतवणूक करतात.

ग्रीनशुचा पर्याय उपलब्ध
या CPSE ETF ला निप्पोन लाईफ इंडिया अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी मॅनेज करत आहे. अँकर इन्वेस्टर्ससाठी हा गुरुवारीच खुला केला जाणार आहे. यानंतर एकाच दिवसात म्हणजे शुक्रवारी हा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाणार आहे. 6 एफएफओ किंवा सातव्या ट्रांचसाठी बेसिक प्राईज 10 हजार ठेवण्यात आली आहे. जर याचं ओव्हर सब्सक्रिप्शन झालं तर यासाठी ग्रीनशुचा पर्यायदेखील आहे.