‘खेकडे’ धरण फोडू शकतात ; आदित्य ठाकरेंनी दिली ‘शास्त्रीय’ कारणे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर शिवसेना भाजप आतापासूनच तयारीला लागले आहेत. युवासेनेचे आदित्य ठाकरे सध्या ‘जन आशीर्वाद यात्रा’ करत आहेत. त्यात ते समाजातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात ते सध्या यात्रेनिमित्त सोलापूरात आहेत.

यात्रेत आदित्य संवाद असा कार्यक्रम करत असतात. यात ते जनतेशी संपर्क साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. सोलापूरातील या कार्यक्रमात वालचंद कॉलेज मधील एका विद्यार्थ्याने फिरकी घेणारा प्रश्न विचारला. हा प्रश्न मागच्या महिन्यात कोकणातील फुटलेले तिवरे धरणाबाबत होता. धरण खेकड्यांमुळे कसे फुटू शकते ? असा सवाल केला. त्यावेळी शिवसेनेचे नेते तानाजी सावंत मंचावर उपस्थित होते. त्यामुळे आदित्य ठाकरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

यावेळी आदित्य ठाकरेंनी इंजिनिअरींगचा हवाला दिला आणि खेकडे कसं धरण फोडण्याची शक्यता आहे याची शास्त्रीय कारण देत उत्तर दिले. नाशिकच्या मेरी या संस्थेने तिवरे धरणाच्या फुटीवर दिलेल्या अहवालातले निष्कर्षही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानुसार खेकड्यांची धरण पोखरण्याची क्षमता आहे आणि ते जमीन पोखरू शकतात असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे असंही त्यांनी उत्तर दिलं. मात्र त्यावरही आता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. खेकडे धरण पोखरत असताना इंजिनिअर्स काय करत होते असा प्रश्न आता विचारण्यात येतोय. त्यामुळे पुन्हा तिवरे धरणाचा प्रश्न वर आला आहे.

दरम्यान, मागच्या महिन्यात कोकणातील तिवरे धरण फुटले होते. त्यात अनेकांचे जीव गेले होते. १९ लोकांचे मृतदेह यात सापडले पण अनेकांचे मृतदेहही सापडले नाही. आणि या घटनेला शिवसेना नेते सावंत यांनी खेकड्यांना जबाबदार धरले होते. खेकड्यांनी धरण पोखरले म्हणून धरण फुटले, असं म्हटलं होते. त्यावर त्यांनी खेकड्यांनी धरण कसं फोडलं म्हणून शिवसेना आणि सावंत यांच्यावर टीका करण्यात आली होती.

आरोग्यविषयक वृत्त