हैदराबादमध्ये ऑक्सिजनचा काळाबाजार, 1 लाखांना विकले जातेय सिलेंडर

हैदराबाद : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा काळाबाजार सुरू झाला आहे. हैदराबादमध्ये कोरोना रूग्ण हे सिलिंडर एक लाख रुपयात खरेदी करत आहेत. हे ते लोक आहेत, जे क्वारंटाइनमुळे घरात राहत आहेत. गेल्या दोन दिवसांत हैदराबाद पोलिसांनी परवान्याशिवाय ऑक्सिजनची विक्री करणार्‍या बर्‍याच लोकांना अटक केली आहे.

पोलिसांनी केली अटक
यासंदर्भात पोलिसांनी रविवारी शाईक अकबर नावाच्या व्यक्तीला अटक केली. तो कोणत्याही परवान्याविना ऑक्सिजन आणि गॅस सिलिंडरची विक्री करत असल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ऑक्सिजनचे १९ सिलिंडर जप्त केले. परवान्याविना सिलिंडर विकल्याबद्दल व्यापाऱ्यांवर पोलिसांनी प्रथमच गुन्हा दाखल केलेला नाही. शनिवारीही शहरातील सेव्हन टॉम्ब्स परिसरातून २९ ऑक्सिजन सिलिंडर जप्त करण्यात आले होते.

ऑक्सिजन सिलेंडरची मागणी जास्त
तेलंगणामध्ये कोरोनाची ६० टक्के पेक्षा जास्त प्रकरणे हैदराबादमधूनच येत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर क्वारंटाईन करणारे लोक ऑक्सिजन सिलिंडरची मागणी करत आहेत. सरकारी डॉक्टरांनीही सांगितले आहे की, शहरात ऑक्सिजन सिलिंडर्सची मोठी कमतरता आहे. तर सरकारच्या मते, रुग्णालयात कोरोना रूग्णांसाठी ३५३७ ऑक्सिजन बेड आहेत, त्यातील २९२६ रिकामे आहेत.

वाढवली जात आहे बेडची संख्या
देशभरात ऑक्सिजन सपोर्ट असलेल्या बेडची संख्याही सतत वाढवली जात आहे. २७ जूनपर्यंत देशात ५१,३२१ ऑक्सिजन-सपोर्ट बेड तयार झाले होते. मंत्र्यांच्या बैठकीत म्हटले गेले होते की, ९ जुलै पर्यंत त्याची संख्या १.४२ लाख करण्यात येईल. जेव्हा रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९२-९६% ने कमी होते, तेव्हा डॉक्टर सतर्क होतात. ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी रुग्णाला पोटावर झोपवले जाते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like