रमजानमध्ये दहशतवाद्यांविरोधी कारवाई थांबवा : मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर : वृत्तसंस्था – नेहमी वादग्रस्त विधान करणाऱ्या जम्मू काश्मीरच्या माजि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आता ‘रमजानच्या पवित्र महिण्यात लष्कराने दहशतवादविरोधी कारवाया थांबवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी केंद्र सरकारला आवाहन करीत ही मागणी केली आहे.

यावेळी बोलताना मुफ्ती म्हणाल्या, “रमजान जवळ येतोय. या काळात मुस्लीम नागरिक दिवस रात्र प्रार्थना करत असतात, मशिदीत जात असतात. त्यामुळे गेल्या वर्षी जसे रमजानमध्ये केंद्र सरकारने शस्त्रसंधीला प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रमाणेच यंदाही केंद्र सरकारने रमजानच्या काळात दहशतवाद्यांविरोधातील कारवाया, शोध मोहिम बंद कराव्यात. जेणेकरून जम्मू कश्मीरच्या लोकांना एक महिना तरी शांतता मिळेल’, असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना देखील रमजानच्या काळात हल्ले करू नका असे आवाहन केले आहे.