Cracked Smartphone Screens | आता आपोआप रिपेयर होईल Phone ची तुटलेली स्क्रीन, जाणून घ्या काय आहे शोध

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Phone तुटने सर्वांसाठी दुखदायक असते. जवळपास सर्वच लोकांच्या जीवनात कधीतरी असा प्रसंग घडतो. स्मॉर्टफोनची अ‍ॅक्सेसरीज आणि पार्ट महाग असतात. तर स्क्रीन (Cracked Smartphone Screens) बदलणे सुद्धा स्वस्त काम नाही. दोन भारतीय तंत्रज्ञान संस्थांच्या शास्त्रज्ञांच्या एका टीमने असे संशोधन केले आहे ज्याच्या माध्यमातून तुमची स्क्रीन (Cracked Smartphone Screens) बदलण्याची चिंता आणि अतिरिक्त खर्च होणे भूतकाळातील बाब होईल.

जाणून घ्या काय आहे संशोधन

भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) खड्गपुर आणि भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IIER) कोलकाताच्या संशोधकांच्या एका टीमने नुकता एक पेपर प्रकाशित केला आहे. यामध्ये नवीन सेल्फ हिलिंग क्रिस्टलाईन मटेरियल तंत्रज्ञानाचा उल्लेख केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे तुटलेली ग्लास पुन्हा तिच्या ओरिजनल फॉर्ममध्ये आणले जाऊ शकते.

सिंथेटिक सेल्फ हिलिंग पॉलिमर

संशोधकांचे म्हणणे आहे की, जिवंत ऊती आणि हाडांमधील जखमा भरण्यासाठी मागील एक दशकात अनेक सिंथेटिक सेल्फ हिलिंग पॉलिमर, जेल आणि इतर सॉफ्ट मटेरियलचा वापर होऊ लागला आहे. मात्र, क्रिस्टलीय साहित्यात या प्रकारची दुरूस्तीची नक्कल करणे एक आव्हान बनले आहे कारण ते कठिण असते.

काहीशी अशी आहे कन्सेप्ट

प्रोफेसर सी मल्ला रेड्डी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेले संशोधन या कंन्सेप्टवर आधारित आहे की, मॅकेनिकल इम्पॅक्टच्या परिणामस्वरूप अपूर्ण नुकसान होत नाही. टीमने पोलर अ‍ॅरेजमेंटसह सॉलिड मटेरियल विकसित केले. मटेरियल पीजोइलेक्ट्रिक आहे, ज्याचा अर्थ आहे की हे मॅकेनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये परावर्तीत केले जाऊ शकते.

सेल्फ हिलिंग तंत्रज्ञानाचा आहे मोठा फायदा

शास्त्रज्ञांनी हे करून सुद्धा दाखवले. प्रयोगादरम्यान सुईच्या आकाराच्या क्रिस्टलने बनवलेल्या ग्लासचा वापर करण्यात आला जो जवळपास 2 मिमी लांब आणि 0.2 मिमी रूंद होते.

यामध्ये अनेक आपल्या स्तरांमध्ये शक्तीशाली आकर्षक बळाच्या मदतीने आपसात जोडलेले होते.
वैज्ञानिकांनी म्हटले की, ही कन्सेप्ट नवीन नाही.
सेल्फ हिलिंग तंत्रज्ञानाचा मोठा फायदा याची मजबूती सुद्धा आहे. हे सामान्य मटेरियलच्या तुलनेत 10 पट जास्त हार्ड असते.
मात्र, हे स्पष्ट नाही की आपण बाजारात स्मार्टफोनवर हे तंत्रज्ञान किती लवकर पाहू शकतो.

Web Title : cracked smartphone screens may soon self repair some invention come out know about it

Pune Crime | कोंढव्यात टोळक्याकडून 2 तरुणांवर कोयत्याने वार, एकाला अटक

Pune Crime | कोरोनाच्या संचारबंदीत सिंहगड पायथ्याशी ‘छमछम’,
10 जणांवर FIR; आंबेगावमधील प्रसिद्ध डॉक्टर फरार

Pune Crime | पुण्यात उपचाराच्या बहाण्याने हॉस्पिटलवर दरोडा,
मेडिकल काऊंटरमधील रोकड चोरली; कोंढवा पोलिस ठाण्यात FIR