फटाक्यांचा नियम तोडू नका ; होऊ शकतो ८ दिवसांचा कारावास आणि दंड… 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – पर्यावरणाचा विचार करीत सुप्रीम कोर्टाने रात्री आठ ते दहा याच वेळेत फटाके उडवण्यास परवानगी दिली आहे. आता उरलेल्या 22 तासात म्हणजेच रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी रात्री आठ या वेळेत फटाके उडवल्यास आठ दिवस कारावास होऊ शकतो. त्याशिवाय 1250 रुपयांहून जास्त दंड आकारला जाऊ शकतो, अशी माहिती नाशिक पोलिस आयुक्तांनी दिली आहे.
फटाक्यांच्या आवाजावर 125 डेसिबलपर्यंत मर्यादा आहे. नाशिक शहरात पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी दोन नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

फटाके विक्रेत्यांना पोलिसांनी नियम आखून दिले आहेत. प्रत्येक फटाक्याच्या दुकानात 100 किलो फटाके आणि 500 किलो शोभेच्या फटाक्यांपेक्षा जास्तीचा साठा नसावा. दुकानात मेणबत्ती किंवा तेलाचा दिवा लावू नये, अशा सूचना आहेत.

आतापर्यंत फक्त आमचा वापर केलाय… आता मातंग समाजाची ताकद दाखवू

फटाके विक्रेत्यांसाठी नियम
– फटाके हाताळण्यासाठी पुरेशी जागा असावी आणि दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ नये, याची काळजी घ्यावी
– फटाक्याची लड दहा हजारपेक्षा जास्त लांबीची असू नये
– अॅटमबॉम्ब, तडतडी, बटरफ्लाय, चिडचिडीया, मल्टिलिक्स या फटाक्यांची विक्री करु नये
– चिनी तसेच परदेशी फटाके वापरु नये किंवा विक्री करु नये
– शांतता प्रभाग तसेच शैक्षणिक संस्था, पेट्रोल पंपाजवळ फटक्यांचा वापर टाळावा
नको हे फटाके

फटाके वाजवल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखे वाटत नाही, त्यामुळे फटाक्यांची विक्री जोरात होते. किंबहुना फटाक्यांशिवाय दिवाळी हे समीकरण पचवणे समाजाला कठीण होऊन बसले आहे. फटाक्यांमुळे होणा-या प्रदूषणावर याआधीही कित्येक पर्यावरणप्रेमी संस्थांनी टाहो फोडून त्याचे दूष्परिणाम समोर आणले आहेत. पण सर्व प्रयत्न निरर्थक. फटाक्यांमुळे होणा-या अपघातांकडे कानाडोळा करत फटाके फोडण्याचा आनंद लुटला जातो. फटाक्यावर नियंत्रण आणणे कठीण बाब असून धार्मिक सणामध्ये ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप, असा शासनावर आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु नागरिकांमध्ये फटाक्यांमुळे होणा-या वाईट परिणामांबाबत जागृती करणे नितांत गरजेचे आहे. शालेय स्तरापासून प्रदूषणाबाबत जागृती करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. हा उपक्रम कित्येक शाळांमध्ये समाजसेवी संस्थांमार्फत सुरू आहेच यंदा सुप्रीम कोर्टाने पर्यावरणाचा विचार करीत रात्री आठ ते दहा याच वेळेत फटाके उडवण्यास परवानगी दिली आहे.  पण यावर पूर्णपणे बंदी आणण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.