केवळ ‘मनी’ प्लांटच नाही तर ‘या’ वनस्पतीचेही आहेत अनेक ‘चमत्कारिक’ फायदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रत्येक माणसाची इच्छा असते, त्याच्याकडे एवढे पैसे असावेत की त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. तर काही लोक असेही असतात की त्यांना कठोर परिश्रम करूनही त्यांना फळ मिळत नाही. यश मिळवण्यासाठी मग ते वास्तू टिप्स अवलंबतात. ही लोक संपत्ती वाढविण्यासाठी मनी प्लांट लावतात, परंतु फारच कमी लोकांना माहित आहे की मनी प्लांटपेक्षा क्रॉसुला हा एक फायदेशीर वनस्पती आहे.

क्रॅसुला मनी ट्री म्हणून देखील ओळखले जाते. याला फेंग शुईमध्ये खूप महत्त्व आहे. असे म्हणतात की ही वनस्पती चुंबकासारखे पैसे आकर्षून घेते. ही लहान मखमली वनस्पती गडद हिरव्या रंगाची आहे. त्याची पाने रुंद आहेत व ती पसरट असतात. ही वनस्पती वाढवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. ही वनस्पती कोणत्याही कुंडीत किंवा जमिनीत लावा. त्यांनतर आपोआप त्याची वाढ होत राहते. सावली किंवा ऊन्हात ही वनस्पती कुठेही लावू शकता.

असे मानले जाते की ही वनस्पती सकारात्मक ऊर्जा आणि पैसा आकर्षित करते. ह्या वनस्पतीला घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवा आणि मग बघा तुमच्यावर कसा धनवर्षाव होतो.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like