अभिनेत्री वाणी कपूरच्या ‘दिलखेच’ अदांची सोशलवर ‘चर्चा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर आपल्या लुकमुळं सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आपल्या फोटोंमुळं कधी चाहते तिची वाहवा करतात तर कधी तिला ट्रोलही केलं जातं. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या चाहत्याकंडून जोरदार अटेंशन घेताना दिसत आहेत.

वाणीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या चर्चेत आले आहेत. चाहत्यांना तिचे काही निवडक फोटो विशेष आवडले आहेत. वाणीचे हे फोटो व्हायरल होत आहेत. वाणीच्या व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये अनेक हॉट आणि बोल्ड फोटोंचा समावेश आहे. पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसनं तिनं चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

वाणीच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्सआ आणि कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. काहींनी लुकबद्दल तिला कॉम्प्लिमेंट दिली आहे. तर काहींनी तिच्या सौंदर्याची स्तुती केली आहे. अनेकांना काही फोटोतील तिचा पेहराव आवडला आहे.

वाणी कपूर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. वाणी तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ सोशलवर नेहमीच शेअर करत असते जे व्हायरल होताना दिसत असतात. तिच्या चाहत्यांना तिच्या फोटोंची विशेष उत्सुकता असते. वाणीने याआधी तिचे बोल्ड अंदाजातील अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून आले होते.

वाणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2013 मध्ये शुद्ध देसी रोमांस या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी वाणी काही दिवसांपूर्वीच (2019) वॉर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. 2016 साली आलेल्या बेफिक्रेमध्येही तिनं काम केलं आहे. हा सिनेमा खास काही चालला नाही. वाणी समशेरा या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच दिगदर्शक करण मल्होत्रा आणि रणबीर कपूरसोबत काम करताना दिसणार आहे.