‘निर्भया’ फंडातील निधी ‘खर्च’ करण्यासाठी योग्य कार्यपद्धत तयार करा, मुख्यमंत्र्यांचे ‘आदेश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हैदराबाद, उन्नाव येथे घडलेल्या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण देश हदरला. त्यामुळे देशात, राज्यात प्रश्न उपस्थित झाला तो महिला सुरक्षेचा. मात्र फडणवीस सरकारने गेल्या 5 वर्षात निर्भया फंडातील एकही रुपया खर्च केला नाही. त्यानंतर आता नव्या मुख्यमंत्र्यांनी या निधीच्या विनियोगाच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा असताना फडणवीस सरकारने निर्भया फंडातील एकही रुपया वापरला नसल्याने काँग्रेसकडून फडणवीसांना घेरण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी निर्भया फंडमधील एकही रुपया खर्च केला नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की मला अजूनही लक्षात आलं नाही की गेल्या सरकारने हा निधी खर्च का केला नाही. त्यामुळे आज नव्या मुख्यमंत्र्यांकडून निर्भया फंडाच्या निधीचा योग्य विनियोग करण्याचे आदेश दिले आहेत.

https://twitter.com/OfficeofUT/status/1204358606054838277

आज पोलीस महासंचालक कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यानी यावेळी आदेश दिले की महिलांवरील अत्याचाराबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ आणि जलद कार्यवाही करुन गुन्हेगारांवर वचक बसेल असे काम करावे.

निर्भया फंडाचा योग्य विनियोग करा –
मागी सरकारने 5 वर्षांच्या कालावधीत निर्भया फंडातील निधीचा खर्च न केल्याची बाब गंभीर आहे. या निधी त्वरित आणि कशा प्रकारे विनियोग करता येईल याची कार्यपद्धत तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. राज्य सरकारला केंद्रातून निर्भया फंडासाठी 14 हजार 940 कोटींचा निधी पाठवण्यात आला आहे.

Visit : Policenama.com