1986 साली तयार केलेल्या ‘या’ शोमुळं बनली ‘रामायण’, कोणीच फंडिंग करायला तयार नव्हतं ! जाणून घ्या पूर्ण स्टोरी

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या टीव्हीवर रिटेलीकास्ट होणारा रामानंद सागर यांचा शो रायायण खूपच पाहिला जाताना दिसत आहे. अशात आता रामायणबद्दलचे अनेक जुने किस्सेदेखील चर्चेत येत आहेत. आज आपण हे जाणून घेणार आहोत की, हा शो तयार कसा झाला आहे. हे कोणालाच माहिती नाही की, एक काळ असा होता की, कोणीच यासाठी फंडींग करायला तयार नव्हतं.

ज्या काळात रामायण तयार केली गेली त्या काळात अशा मालिका प्रचलित नव्हत्या. रामानंद सागर यांनी मोठ्या पडद्यावर यशस्वी फिल्म मेकर म्हणून ओळख तयार केली होती. भगवान रामाची लीला आता त्यांना लहान पडद्यावर दाखवायची होती. जेव्हा ते रामायण बनवण्याचा विचार करत होते तेव्हा त्यांना फंड जमा करायला अडचणी आल्या. कोणीच त्यांच्या या आयडियावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं.

रामानंद सागर जिद्दी होते. त्यांनी ठरवलं होतं की, ते रामायण बनवणारच. याशिवाय दुर्गा आणि कृष्णा अशा मालिका तयार करण्याचंही त्यांनी ठऱवलं होतं. त्यांनी सर्वांना विश्वास जिंकण्यासाठी 1986 साली विक्रम बेताल ही मालिका सुरू केली. हा शो खूुप हिट झाला. याचा फायदा असा झाला की, रामायणसाठी फायनांसर्स मिळायला सुरुवात झाली.

यानंतर जेव्हा रामायण ही मालिका तयार करण्यात आली तेव्हा ही देखील हिट झाली. ही मालिका एवढी पाहिली जायची की, जेव्हा शो सुरू असेल तेव्हा रस्ते अक्षरश: रिकामे दिसायचे. त्यांनी दाखवून दिलं की, फक्त सिनेमाच नाही तर लहान पडद्यावरही आपल्या कल्पनेतून क्रांती केली जाऊ शकते.