पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Creative Foundation Pune | गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवितानाच कर्णकर्कश डीजे न लावता सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अश्या पद्धतीने मिरवणूक काढणाऱ्या व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या विविध मंडळाना क्रिएटिव्ह फाउंडेशन व वेस्टर्न इंडिया फोर्जिंग प्रा. लि. कंपनीच्या वतीने स्पीकर सेट भेट देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमांस क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, कै.विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, उमेश भेलके,तसेच महिला उत्सव प्रमुख सौ. कल्याणी खर्डेकर,सौ.अक्षदा भेलके,सौ. श्वेताली भेलके, भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, बाळासाहेब टेमकर, दिलीपराव उंबरकर,आर पी आय ( आठवले ) चे वसंतराव ओव्हाळ, केशवराव पवळे इ मान्यवर उपस्थित होते.(Creative Foundation Pune)
सध्या उत्सवांचे स्वरूप विभत्स होत असून त्यामागचा सामाजिक आशय नष्ट होत आहे,
अश्या परिस्थितीत केवळ कायद्याचा धाक दाखवून बदल होणार नाही तर मंडळाच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणे आणि चांगले कार्यक्रम करणाऱ्या मंडळाना प्रोत्साहन देण्यातूनच बदल घडेल असे संदीप खर्डेकर म्हणाले.
या प्रसंगी शनी मारुती मंडळाचे प्रमुख सचिन पवार,शुभम पेंढारे, राज पेंढारे, आकाश पाडेकर,
जयदीप मंडळाचे संदीप मोकाटे,हर्षल मोहिते, हर्षल कुसाळकर, सौरभ पवार,नवनाथ मंडळाचे रामभाऊ भिसे,
ओम नवनाथ मंडळाचे शंतनू खिलारे, हर्षवर्धन खिलारे, वैभव तनपुरे, शुभम चोरगे, साहिल साळवी,
राजबाग मंडळाचे समीर फाले, ओंकार शिंदे, निहाल सातपुते,सुजीत फाले,छत्रपती शिवाजी मंडळाचे विनायक
गायकवाड, संतोष गायकवाड, अचानक मित्र मंडळाचे विशाल टिळेकर,सोहन मोतीवाले,किरण पोळेकर,
यश बोराडे,खिलारेवाडी मित्र मंडळाचे निखिल धिडे,अनिकेत साठे, स्वामी ठोंबरे, रोहन जोशी, अथर्व साठे,
कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे मिलिंद सातपुते, नवनाथ शिंदे, यासह इतर मंडळाना ही भेट देण्यात आली.
यात स्पीकर सेट, दोन कॉर्डलेस माईक, एक वायर माईक चा समावेश असून त्याला वायफाय व पेनड्राइव्ह
घालण्याची देखील सोय देखील आहे.
दिवाळी दरम्यान काही स्वयंसेवी संस्थांना देखील अशीच भेट देणार असल्याचे ही संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.
हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगतानाच शनी मारुती मंडळाचे सचिन पवार व ओम नवनाथ मंडळाचे शंतनू खिलारे यांनी यापुढे देखील विधायक कार्यक्रमांवर भर देणार असल्याचे सांगितले.
तसेच आपले उत्सव अधिकाधिक लोकाभिमुख व्हावेत यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चे प्रमुख अरुण जिंदल यांनी जाहीर केले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
Pune Crime Branch News | खंडणीच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार आरोपी जेरबंद