Creative Foundation Pune | दहावीच्या परीक्षेत 99% गुण मिळविणाऱ्या ऋतुजा धुमाळचा चंद्रकांत पाटील व मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सत्कार

शिक्षणासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन सर्वतोपरी मदत करणार – संदीप खर्डेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Creative Foundation Pune | मंगळवार पेठेतील वस्तीत राहणाऱ्या ऋतुजा संजय धुमाळ हिने विपरीत परिस्थितीत अभ्यास करत दहावीच्या परीक्षेत दैदीप्यमान यश मिळविले. आज तिच्या ह्या यशाबद्दल क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) व मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), भाजपा च्या ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष सतीश गायकवाड, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, अमोल बालवडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.(Creative Foundation Pune)

यावेळी ऋतुजा ला विविध भेटवस्तू देण्यात आला तर तिच्या शिक्षणासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत करण्याचे वचन चंद्रकांत पाटील व क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे संदीप खर्डेकर यांनी दिले. मंगळवार पेठेतील छोट्याश्या घरात राहणाऱ्या ऋतुजा चे वडील इलेक्ट्रिक ची कामं करतात तर आई गृहिणी आहे. हुजूरपागेत शिकणाऱ्या ऋतुजा ला आपटे प्रशालेत प्रवेश घेऊन पुढे बारावी नंतर इंजिनियर व्हायचे आहे तसेच एम पी एस सी, यू पी एस सी ची परीक्षा देण्याचा विचार देखील तिने बोलून दाखवला. तिच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन सर्वच मान्यवरांनी दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : पिस्टल व कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या 3 सराईतांना अटक, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

Action On Rooftop-Resto Bar-Pubs In Pune | 63 रूफटॉप, रेस्टो बार, पबचे परवाने निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कारवाई