‘क्रेडिट’ अन् ‘डेबिट’ कार्डवर मोफत मिळतात ‘या’ सेवा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसात देशात कार्ड पेमेंटचा व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी इंधन भरण्यापासून ते सिनेमाच तिकीट बुकींग करण्यापर्यंत आता डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर होत आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, प्रत्येक वर्षी देशामध्ये तब्बल दीड कोटी क्रेडिट कार्ड वाटले जातात. परंतु आजही असे अनेक लोक आहेत. ज्यांना क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व नियमांची माहिती, खास वैशिष्टये याची माहिती नाही. त्यामुळे त्याचा फायदा घेता येत नाही. यासाठी जाणून घेऊयात काय आहे महत्त्वाची वैशिष्ट्ये.

सवयीनुसार घ्या कार्ड
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य कार्डची निवड करणे. क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी बँक कर्मचारी तुमच्याशी अनेक वेळा संपर्क करतात. परंतु कुठलेही कार्ड घेण्याआधी तुम्ही खर्चाच्या पद्धतीबद्दल विचार केला पाहिजे. म्हणजे, तुम्ही स्वत: ची बाईक वापरत असल्यास तुम्ही को-ब्रँडेड इंधन कार्ड घ्याव. हे कार्ड तुम्हाला इंधनात मोठ्या प्रमाणात सूट देते.

जास्त व्याज दर टाळा
क्रेडिट कार्ड तुम्हाला विनामूल्य क्रेडिट सुविधा पुरवते. पण तुम्ही जर हफ्ता चुकवला तर त्यासाठी तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागतात. यामुळे महागडं पेमेंट टाळण्यासाठी, देय वेळेवर देणे महत्वाचे आहे. त्यामुळे कार्ड घेताना या बाबी लक्षात असूद्या.

एकापेक्षा जास्त कार्ड घेणे योग्य आहे का ?
जितके जास्त कार्ड तुम्ही वापराल तितका जास्त खर्च तुम्हाला आहे. पण जास्त वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त कार्ड असले पाहिजे असे लोक सल्ला देतात. अधिक कार्डे असण्याने आपण अधिक व्यवहाराचा लाभ घेण्यास सक्षम असाल.