Loan घ्यायचं तर मग जाणून घ्या ‘या’ 4 महत्वाच्या गोष्टी, बँक असो की नॉन-बँकिंग कंपनी तात्काळ होईल ‘मंजूर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था  –  कोणत्याही बँकेकडून लोन घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर खुप महत्वाचा असतो. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर लोन मिळण्याची शक्यता वाढते. तसेच लोनच्या रक्कमेतही वाढ होऊ शकते. कोणतीही बँक अथवा नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी लोन देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर तपासतात. संबंधित व्यक्तीने कुठे कर्जासाठी अर्ज केला आहे का, त्याला कर्ज द्यावे का हे यावरून ठरवले जाते.

क्रेडिट स्कोअरवरून बँकांना समजते की संबंधित व्यक्तीची रिपेमेंट हिस्ट्री ठिक आहे अथवा नाही. आज आम्ही तुम्हाला क्रेडिट स्कोअरशी संबंधित महत्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत, जेणेकरून कर्जासाठी अर्ज करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तसेच पुढच्यावेळी लोनसाठी अर्ज करताना तुम्हाला सर्व गोष्टी माहिती असाव्यात.

क्रेडिट स्कोअर किती असावा?
क्रेडिट स्कोअरच्या मदतीने तुमच्या मागील कर्जाची माहिती मिळते. जर क्रेडिट स्कोअर चांगला असेल तरच लोन मिळते. वेळेवर ईएमआय भरलेला असल्यास क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 अंकाच्या दरम्यान असतो. जर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर त्यास कर्ज मिळणे सोपे जाते. क्रेडिट स्कोअरमध्ये मागील 24 महीन्यांची क्रेडिट हिस्ट्री असते.

क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. यासाठी वेळेवर बिले भरा. वेळोवेळी क्रेडिट स्कोअरची माहिती घ्या. जरूरीनुसारच को-ब्रँडेड कार्ड घ्या. वीजेपासून इंश्युरन्सपर्यंतची सर्व बिले वेळच्यावेळी भरा. सोबतच, गॅरन्टी देणार्‍याचे अकाउंट मॉनिटर करा.

कोणत्या गोष्टींवर ठरतो क्रेडिट स्कोअर?
वेळेवर कर्ज चुकवण्याबाबत क्रेडिट स्कोअरमध्ये 30 टक्के भाग असतो. सेक्युर्ड किंवा अन सेक्युर्ड लोनचा 25 टक्के भाग असतो. सेक्युर्ड लोन म्हणजे कार लोन किंवा होम लोन इत्यादीचा समावेश असतो. तर, अनसेक्युर्ड लोनमध्ये पर्सनल लोन इत्यादीचा सहभाग असतो. क्रेडिट स्कोअरमध्ये क्रेडिट एक्सपोजर 25 टक्के असते. तर, कर्जाच्या वापरासाठी क्रेडिट स्कोअरमध्ये 20 टक्के भाग असतो.

कसा पहाल सिबिल रिपोर्ट
तुमचा क्रेडिट स्कोअर जाणून घेण्यासाठी www.cibil.com वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरा. यासाठी तुम्हाला 550 रुपये शुल्क भरावे लागेल. यासाठी एक वेळ ऑथेंटिकेशनची प्रक्रिया होते. या ऑथेंटिकेशननंतर सिबिल स्कोअर मिळतो. हा स्कोअर तुम्हाला ई-मेलद्वारे पाठवला जातो.

सिबिलमध्ये सुधारणा कशी करावी
क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी तुमच्या पूर्ण क्रेडिट कार्डच्या पूर्ण लिमिटचा वापर करू नका. क्रेडिट कार्डपेक्षा जास्त लोन घेऊ नका. कर्जासाठी जास्त अर्ज करू नका. होम लोन आणि ऑटो लोनला महत्व द्या. पर्सनल लोन घेणे शक्यतो टाळा. क्रेडिट कार्ड बंद होणार नाही याची काळजी घ्या. ज्वॉइंट अकाउंट खात्यांची तपासणी करा. सिबिल स्कोअरची समीक्षा करत रहा.