Credit Card | क्रेडिट कार्डचा वापर करताना लक्ष ठेवा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Credit Card | डिजिटल व्यवहारांच्या जगात क्रेडिट कार्ड (Credit Card) देखील एक आवश्यक भाग बनले आहे. असे अनेक लोक आहेत जे एकाच वेळी अनेक क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्ड ही नक्कीच खूप उपयुक्त गोष्ट आहे. क्रेडिट कार्डचा वापर दैनंदिन जीवनात खरेदी, बिल भरणे (Bill Payments), व्यवहार इत्यादी सर्व आर्थिक गरजांसाठी केला जातो.

 

याचा हुशारीने वापर केल्याने तुमच्या आर्थिक गरजा वेळेवर पूर्ण होतातच, शिवाय घराबाहेर पडताना तुम्हाला तणावमुक्तही वाटते. पण थोडासा निष्काळजीपणा क्रेडिट कार्डमुळे आयुष्यात गोंधळ उडवतो. एकदा माणूस कर्जाच्या सापळ्यात अडकला की तो फसत जातो.

 

जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या वापराविषयी समजदारी दाखवली तर कर्ज टाळू शकता, बचत देखील करू शकता. असे लोक देखील आहेत जे क्रेडिट कार्ड वापरून बचत करतात, हवाई किंवा ट्रेनच्या भाड्यावरील सूट (Discount) आणि ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) ऑफरचा लाभ घेतात.

 

या पद्धतीचा करा अवलंब
क्रेडिट कार्डने बचत करता येते आणि त्यासाठी एकाच वेळी अनेक क्रेडिट कार्ड वापरणे (Use of Credit Card) टाळावे. क्रेडिट कार्डचे बिल (Credit Card Bill) वेळेवर भरल्यास बिलावरील व्याज टाळता येते. क्रेडिट कार्डच्या बिलावर जास्त व्याज द्यावे लागते.

 

क्रेडिट कार्डची मर्यादा (Credit Card Limit) तुमच्या मासिक उत्पन्नापेक्षा जास्त नसावी. कारण क्रेडिट कार्डने खरेदी करताना आपण किती खरेदी केली आहे, याचा विचार केला जात नाही. म्हणून, कार्डची मर्यादा उत्पन्नाच्या आत असावी. जेणेकरून बिल भरताना विचार करावा लागणार नाही. क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवल्याने EMI चा भार वाढतो.

रिवॉर्डचा वापर
क्रेडिट कार्डने खरेदी करताना किंवा इतर बिले भरताना काही रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात.
या रिवॉर्डसह पुढील खरेदीवर सूट मिळवू शकता. वेळोवेळी कूपन देखील मिळतात.
रिवॉर्ड पॉईंट आणि कूपनद्वारे मासिक खर्चात बचत करू शकता.
क्रेडिट कार्डने ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदीसाठी 10 टक्के किंवा त्याहून अधिक कॅशबॅक देखील मिळू शकतो.
सणासुदीच्या काळात अशा अनेक ऑफर्स येत असतात.

 

वेळेवर पेमेंट
क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरली पाहिजेत. वेळेवर पेमेंट केल्याने, क्रेडिट स्कोअर देखील चांगला राहील.
जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर खूप व्याज भरावे लागते.

 

 

Web Title :- Credit Crad | credit card apply online credit card bill payment card limit and statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

APY | ‘या’ सरकारी योजनेत पती-पत्नी दोघांना मिळेल रक्कम, दर महिना कमावू शकता 10,000 रुपये; जाणून घ्या कसे?

OBC Reservation | केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी आरक्षणाचा बळी घेतला, विजय वडेट्टीवारांचा घणाखाती आरोप; म्हणाले – ‘…तर मंत्रिपदाचा त्याग करणार’

PM KISAN चा 10 वा हप्ता ! 11 कोटी शेतकर्‍यांना 1.8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर, पहा लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही