नोकरी गेल्याने प्रभावित होऊ शकतो तुमचा Credit Score, एक्सपर्ट सांगतात या 5 गोष्टींची घ्यावी काळजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Credit Score | अनेक लोकांना माहित नाही की नोकरी जाणे आणि मोठ्या कालावधीपर्यंत बेरोजगार राहिल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर (Credit Score) प्रभाव पडू शकतो. क्रेडिट स्कोअर तुमचे मागील कर्ज, थकबाकीसह परतफेडीची सुद्धा काळजी घेते. परंतु यातून हे समजत नाही की तुम्ही नोकरी करत आहात किंवा नाही. यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर नोकरी जाण्याने प्रभावित होत नाही, यासाठी तुम्ही तुमचे कर्ज किंवा हप्त्यांचा भरणा वेळेवर करत राहा.

भारतात चार प्रमुख क्रेडिट स्कोरिंग एजन्सी –
सिबिल, एक्सपेरियन पीएलसी, इक्विफॅक्स इंक, आणि हायमार्क फेडेरल क्रेडिट यूनियन क्रेडिट स्कोअर ठरवतात. तुमचा के्रडिट रिपोर्ट बनवताना एजन्सी तुमचे कर्ज आणि क्रेडिट कार्डसंबंधी माहितीचा सुद्धा समावेश करतात आणि ही माहिती सात वर्षापर्यंतची असू शकते.

जरी तुमच्या रिपोर्टमध्ये नियुक्तीच्या स्थितीचा कोणताही रेकॉर्ड, कामाचा इतिहास किंवा वैयक्तिक उत्पन्न नसेल, पण सत्य हे आहे की नोकरी गेल्याने ईएमआय वेळेवर न भरण्याची शक्यता वाढू शकते आणि यासाठी, क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. (Credit Score)

 

नोकरी गेल्यानंतर क्रेडिट स्कोअर कसा सुधारावा?

1. वेळेवर बिले भरा
बिले दरमहिन्याला वेळेवर भरण्यास सुरूवात केली तर काही काळात तुमचा क्रेडिट स्कोअर ठिक करू शकता.

 

2. आपले कर्ज कमी करणे
क्रेडिट कार्डची थकबाकी कमी करून क्रेडिट युटिलायजेशन रेशियो (कर्ज वापर प्रमाण) कमी करू शकता. यामुळे क्रेडिट स्कोअर चांगल होईल. थोडी बचत असेल तर त्याद्वारे छोटी कर्ज वेळेपूर्वी बंद करा.

 

3. नवीन कर्जासाठी अर्ज मर्यादित करा
नवीन कर्जाच्या अर्जाची माहिती तुमच्या फाइलमध्ये सुमारे दोन वर्ष राहते. यासाठी, नवीन कर्जासाठी ठोस विचारपूस करण्याची संख्या कमी करा. स्थिर नोकरीशिवाय तुम्ही या कर्जाची परतफेड करू शकत नाही हे तुम्हाला माहित आहे तर कर्जासाठी अर्ज करू नका.

 

4. आपल्या क्रेडिट कार्ड रिपोर्टमधील त्रुटी ओळखा
तुमचा क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी पहा, कारण चूका असू शकतात. याशिवाय, कधी-कधी रिपोर्ट वेळेवर अपडेट होत नाही. दर सहा महिन्याला अहवाल तपासा. (Credit Score)

5. थकबाकी भरा
जर एखादी थकबाकी भरायची आहे, क्रेडिट कार्डवर काही थकबाकी आहे किंवा एखादे डेट इंस्ट्रूमेंट आहे तर ते क्लियर करणे आवश्यक आहे,
ज्यामुळे क्रेडिट स्कोअर चांगला होईल.

 

जरी नोकरी नसेल तरी, हे महत्वाचे आहे की, तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर हाय ठेवा.
कारण अनेक कंपन्या नियुक्ती प्रक्रिया अंतर्गत क्रेडिट तपासतात.
म्हणजे खराब क्रेडिट इतिहास तुमच्या संभाव्य नोकरीत बांधा बनू शकतो.

 

यासाठी, तुमच्या बिलांचा भरणा वेळेवर करा आणि क्रेडिट स्कोअर चांगला करा.
नोकरी गमावणे खुप त्रासदायक असते, आणि जेव्हा नोकरी मिळवण्यावर फोकस करत असाल तेव्हा क्रेडिट स्कोअर सुद्धा हाय ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे,
जेणेकरून पुढील नोकरी सहज मिळेल.

 

Web Title :- Credit Score| job loss can effect your credit score know how to keep it high

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maratha Reservation | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख

Jiomart Groceries Orders On Whatsapp | आता WhatsApp वरुन मागवता येणार किराणा सामान, जाणून घ्या

Senior Citizens Get These Tax Benefits | ज्येष्ठ नागरिकांना मिळतात ‘हे’ टॅक्स बेनिफिट, तुम्ही कधी घेतला आहे का लाभ! जाणून घ्या सर्वकाही