पुणे : पतसंस्था संचालकांनी केली साडेचार कोटींची अफरातफर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

जादा व्याजदर देण्याचे अमिष दाखवून ठेवीदारांकडून ठेवी घेऊन, बनावट कर्जप्रकरणे सादर करुन पतसंस्थेतमध्ये ४ कोटी ४९ लाख ७९ हजार ६७३ रुपयांचा अपहार करण्यात आला. या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष, मानदसचिव, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार श्री नवलोबानाथ नागरी सहकारी पतसंस्थेत एप्रिल २००९ ते मार्च २०१६ दरम्यान घडला.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d17202a6-90cf-11e8-82b9-41099c3cc5d8′]

राजाराम नारायण शेळके (वय-५७ रा. मुंढवा) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेळके यांच्या फिर्यादेवरुन खडक पोलिसांनी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक बाबासाहेब तांबे (रा. घोरपडे पेठ), मानदसचिव संजय दत्तात्रय कोंडे (रा. घोरपडे पेठ), उपाध्यक्ष अविनाश लक्ष्मण घोरपडे (रा. बालाजीनगर) आणि व्यवस्थापक शेखर भिकाजी पाचारणे (रा. राजगुरुनगर) यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेत असलेल्या श्री नवलोबानाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानदसचिव, व्यवस्थापक यांनी ठेवीदारांकडून प्रचलीत व्याज दरापेक्षा जास्त व्याजदर देऊन ठेवी स्विकारल्या. ठेवीदारांना पतसंस्थेकडून मुदत ठेव पावती देण्यात आली मात्र रक्कम पतसंस्थेत जमा केली नाही. ठेवीदारांकडून स्विकारलेल्या पैशातून आरोपींनी नियमबाह्य कर्ज वाटप केले. तसेच बनावट कर्ज प्रकरणे तयार करुन पतसंस्थेत ४ कोटी ४९ लाख ७९ हजार ६७३ रुपयांचा अपहार केला. ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपून देखील ठेवीदारांना पैशांची परतफेड न करता आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे करीत आहेत.
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d688a7a5-90cf-11e8-9467-4b8dad5d2c72′]