हरल्यामुळं रागावलेल्या पाकिस्तानी फॅन्सनं कप्तान सरफराज अहमदच्या मुसकाडात लगावली (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी क्रिकेट संघाचा श्रीलंकेकडून मोठा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघ आपल्या देशावासियांकडून टीकेचे धनी झाला आहे. पाकिस्तानच्या या पराभवाला मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक यांची धोरणात्मक स्थिती जबाबदार आहे असे काहीचे म्हणणे आहे, तर काहींचे म्हणणे आहे की पाक संघाचा कर्णधार आपल्या प्रदर्शनात देखील अपयशी ठरला. पाकने भले की वनडे सीरीजमध्ये 2 – 0 असा विजय मिळवला असेल परंतू टी – 20 मध्ये मात्र पाकचा श्रीलंकेने नमवत 3-0 असा पराभव केला. आपल्या देशात पाकिस्तानला आपला पराभव सहन होत नाही.

पाकने श्रीलंकेबरोबर खेळून चार वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा पदार्पण करत आहे. श्रीलंकेने पाकला पहिल्या टी – 20 मध्ये 64 धावांनी हरवले. तर दुसऱ्या सामन्यात 35 धावा करुन पराभव केला. तर शेवटच्या सामन्यात 13 धावा करुन श्रीलंकेने एकतर्फी विजय मिळवला.

यानंतर पाकिस्तानी क्रिकेट चाहते चांगलेच भडकले त्यांनी कर्णधार सरफराज अहमदवर देखील आपला राग व्यक्त केला. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तान – श्रीलंका यांच्यामधील टी 20 चे तीन सामने गद्दाफी स्टेडियम मध्ये खेळवण्यात आले. तिसऱ्या सामन्यात पाकला 148 धावांचे लक्ष होते. परंतू पाकने संपूर्ण सीरिज गमावली. यानंतर सरफराड अहमद यांच्या पुतळ्यावर चाहत्यांकडून फटके मारले जात आहेत. काही चाहत्यांने सरफराज अहमदच्या होर्डिंंगवर त्यांच्या चेहऱ्यावर कानशिलात मारले. याचा व्हिडिओ आता व्हायरल होताना दिसत आहे.

काय झाले टी – 20 सीरीजमध्ये 
पहिल्यांदा टी – 20 मध्ये श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 165 धावाचे आव्हान ठेवले होते. परंतू पाकिस्तानचा संघ 17.4 ओवरमध्ये 101 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या सामन्यात पाक समोर 182 धावांचे लक्ष होते परंतू पाकिस्तानच्या संघ 19 ओवरमध्ये 147 रन करुन गारद झाला. तर शेवटच्या सामन्यात पाकिस्तान संघासमोर फक्त 142 धावांचे आव्हान होते परंतू पाकिस्ताने ही संधी गमावली आणि 13 धावा बाकी असताना पाकिस्तान संघाचा पराभव झाला.

आयसीसी वर्ल्ड कप 2019 मध्ये पाकिस्तानचा संघ सेमीफायनल पर्यंत पोहचू शकला नाही. यावेळी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या झालेल्या सामन्यात पाकचा पराभव झाला होता. यानंतर सरफराज अहमद याला पाकिस्तानच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात येणार होते परंतू संघाच्या व्यवस्थापनाने त्यांच्यावर विश्वास ठेवत त्याला कर्णधारपदी कायम ठेवले. परंतू ना की त्यानंतर सरफराजने चांगले प्रदर्शन केले ना की पाकिस्तानची टीम चांगले प्रदर्शन करु शकली नाही.

Visit : Policenama.com