13 वर्षात 9 हजारांपेक्षा अधिक ‘रन’, सुमारे 300 ‘विकेट’ पण MS धोनीनं खेळवलं फक्त 3 ‘मॅच’मध्ये, आता ‘त्यानं’ घेतली ‘निवृत्ती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 3-0 असे पराभूत केले असताना दुसऱ्या बाजूला भारतीय संघाचा खेळाडू राहिलेल्या अभिषेक नायर याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली असून त्याने मुंबई आणि पॉंडिचेरीसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत.

सध्या अभिषेक नायर कॅरिबिअन प्रीमिअर लीगमध्ये त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहे. त्याने मागील महिन्यातच मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयला आपल्या निवृत्तीबाबत कल्पना दिली होती. ट्विटरवरून आपल्या निवृत्तीची घोषणा त्याने म्हटले कि, कारकिर्दीत सहयोग केलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. माझ्यासाठी हि खूप सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट असून या खेळासाठी मी सर्व काही दिले. कोणत्याही गोष्टींची खंत नसून पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

दिनेश कार्तिकचा मेंटॉर, मुंबईला विजेतेपद मिळवून दिले
मुंबईच्या रणजी विजयांमध्ये अभिषेक नायर याचे मोलाचे योगदान असून त्याने 2006 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने मुंबईला सलग विजेतेपद जिंकून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. त्याचबरोबर त्याने भारताचा फलंदाज दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर आणि उन्मुक्त चंद यांचा मेंटॉर म्हणून देखील काम केले.

धोनीच्या नेतृत्वात खेळला भारतीय संघामध्ये
३६ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने भारतीय संघासाठी 3 एकदिवसीय सामने खेळले. हे सर्व सामने त्याने माजी कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले. 2009 मध्ये विंडीजविरुद्ध हे तिन्ही सामने त्याने खेळले होते. त्यानंतर त्याचे प्रदर्शन घसरल्याने त्याला भारतीय संघात आपले स्थान टिकवता आले नाही.

टाकले १७ चेंडूंचे षटक
अभिषेक नायर याचा जन्म 8 ऑक्टोबर 1983 रोजी सिकंदराबादमध्ये झाला. त्याचे आईवडील हे मूळचे केरळचे असून त्याने शिवाजीपार्कमध्ये खेळून आपली कारकीर्द घडवली आहे. त्याने देवधर ट्रॉफीमध्ये साउथ झोनच्या विरुद्ध खेळताना तब्बल 17 चेंडूंचे एक षटक टाकले होते. यामध्ये दहा वाईड आणि एका नो बॉलचा समावेश होता.

रणजीमध्ये महत्वाचा खेळाडू
2012/2013 या रणजी ट्रॉफी सत्रात त्याने दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने मुंबईसाठी एका सत्रात 966 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला या प्रदर्शनासाठी लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आयपीएलमध्ये देखील मुंबई इंडियन्ससाठी काही सामने खेळले होते. तसेच पुणे वॉरियर्स आणि राजस्‍थान रॉयल्ससाठी देखील काही सामने खेळले होते.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 173 विकेट, 5749 धावा
अभिषेक नायर याने आपल्या 13 वर्षाच्या मोठ्या कारकिर्दीत 103 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 5749 धावा केल्या आहेत तर 173 विकेट देखील घेतल्या आहेत. याचबरोबर घरेलू सामन्यांमध्ये त्याने 9185 धावांसह 279 विकेट देखील घेतल्या आहेत.

Visit : Policenama.com