BCCI चा ‘कॅप्टन’ला ‘विराट’ धक्‍का ! ‘या’ प्रक्रियेतून कोहली बाहेर

नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात क्रीडा रसिक नाराज आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देखील पदावरून हटवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांनी देखील आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली नसल्याने त्यांच्यावर देखील नाराजी मोठया प्रमाणात पाहायला मिळत आहे.

बीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. त्याचबरोबर सपोर्ट स्टाफमधील देखील काही जणांची सुट्टी होणार असल्याने या पदांसाठी देखील अर्ज मागवले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक कोण असणार याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र याच दरम्यान बीसीसीआयने नवीन निर्णय घेतला आहे कि, या निवड प्रक्रियेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचे मत विचारात घेतले जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावेळी कोहलीची आवड ध्यानात घेतली जाणार नाही.

कोहलीचे मत विचारात घेणार नाही

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी प्रशिक्षक पदाच्या निवडीत कोहलीचे मत विचारात घेतले जाणार नाही. २०१७ मध्ये रवी शास्त्री यांच्या निवडीवेळी बीसीसीआयने विराट कोहली याला विचारले होते. मात्र यावेळी त्याला विचारले जाणार नाही. यावेळी संपूर्ण निर्णय भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे घेणार असून त्यावर प्रशासकीय समिती शेवटचा निर्णय घेणार आहे.

कपिल देव घेणार निर्णय

२०१७ मध्ये अनिल कुंबळे यांना प्रशिक्षक पदावरून हटवण्यात आल्यानंतर कर्णधार विराट कोहली याचा सल्ला विचारात घेऊन रवि शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र यावेळी फक्त माजी कर्णधार कपिल देव निर्णय घेणार असून विराट कोहली याला अजिबात विचारणार नसल्याचे समजते.

‘या’ १० पैकी काही ‘एक’ खाल्ल्यास शरीरातील रक्‍ताचे (HB) प्रमाण वाढेल, जाणून घ्या

वैवाहिक जीवनात ‘हा’ आहार घ्या अन् घ्या सळसळत्या तारूण्याचा अनुभव, जाणून घ्या

चाळिशीनंतर ‘वजन’ नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय

‘या’ 2 उपायांमुळे कंबरदुखी होईल ‘गायब’, कधीही होणार नाही त्रास, जाणून घ्या

डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या

मेंदी अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या

You might also like