अमिताभ बच्चन यांनी शेअर केली भविष्यातील महिला क्रिकेट टिम, जीवा बनणार कर्णधार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नुकताच एका मुलीचा बाप झाला आहे. विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली. मुलीच्या जन्माची माहिती दिल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रीडा जगाबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटीही विराट आणि अनुष्का शर्माचे अभिनंदन करत आहेत. या सर्वांच्या दरम्यान बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही भविष्यातील महिला क्रिकेट टीम तयार केली आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये टीम इंडियाच्या 13 खेळाडूंची नावे लिहिली आहेत, जे मुलीचे वडील आहेत. यासह यावर लिहिले – भविष्यातील महिला क्रिकेट संघ तयार होत आहे. हे चित्र शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे – महेंद्रसिंग धोनीला देखील एक मुलगी आहे. ती कर्णधार असेल ?

या यादीत सुरेश रैना, गौतम गंभीर, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, रिद्धिमान साहा, हरभजन सिंग, टी नटराजन, उमेश यादव आणि विराट कोहली यांची नावे लिहिली आहेत. हे सर्व खेळाडू मुलीचे वडील आहेत. सोशल मीडियावर या खेळाडूंप्रमाणेच त्यांच्या मुलीही खूप लोकप्रिय आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवर चाहत्यांनीही खूप चांगली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी मुलींना खास असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विराट कोहलीने अनुष्का शर्माबरोबर एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता आणि आपल्या चाहत्यांना सांगितले की आम्ही पालक बनणार असून जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या घरी एक नवीन पाहून येणार आहे. यानंतर इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा सीझन खेळण्यासाठी विराट कोहली युएईला आला. यावेळी अनुष्कासुद्धा त्याच्यासोबत होती. आयपीएल 2020 नंतर विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर रवाना झाला होता, परंतु त्याने पॅटर्निटी रजा घेतली होती. अशा परिस्थितीत विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर टी – 20 आणि एकदिवसीय मालिकेसह पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर मायदेशी परतला.