‘क्रिकेटचा देव’ सचिन ऑस्ट्रेलियाला मदत करणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलिया येथे जंगलात लागलेल्या भीषण आगीत शेकडो प्राण्यांचा मृत्यू झाला. सोबतच निसर्गाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता कुठे या आगीतून सावरत असताना आस्ट्रेलियाला आणखी एका नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आगीने उध्वस्त झालेलं शहर आणि जंगल पुन्हा उभारण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाज शेन वॉर्ननं त्याची ग्रीन कॅपचा लिलाव करून जवळपास 4.9 कोटींची रक्कम जमवली आहे.

तर दुसरीकडे माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि वॉर्न मदत म्हणून आवश्यक निधी गोळा करण्यासाठी एका क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, 8 फेब्रुवारीला या सामन्यासाठी सचिन तेंडुलकर सोबतच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनाही बोलावण्यात आले होते. पण, सचिन फलंदाज म्हणून नव्हे, प्रशिक्षक म्हणून सहभाग घेत ऑस्ट्रेलिया आगीतील पुनर्वसनासाठी मदत करणार आहे. तसेच तेंडुलकर यांच्यासोबतच या सामन्यात वेस्ट इंडिडचा महान गोलंदाज कर्टनी वॉल्श हे अनुक्रमे पाँटिंग एकादश आणि वॉर्न एकादश संघाच्या प्रशिक्षकपदी दिसणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –