ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ महान खेळाडूला ‘कॅन्सर’, ५ आठवड्यापासून देतोय मृत्यूशी झुंज

सिडने : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार आणि सध्याच्या काळातील चांगल्या समालोचकांपैकी एक असलेले इयान चॅपल यांना कॅन्सरचे निदान झाले आहे. या जीवघेण्या रोग झाल्याची माहिती स्वतः चॅपल यांनी दिली आहे. ७५ वर्षीय चॅपल यांनी सांगितले की, त्यांना त्वचेचा कॅन्सर आहे आणि गेल्या पाच आठवड्यापासून त्यांच्यावर रेडिएशन थेरपी करण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलिया संघासाठी ७५ कसोटी सामने खेळणाऱ्या चॅपल यांना खांदा, मान आणि अंडर आर्म या भागात कॅन्सर आहे. आपल्या दमदार चॅपल यांच्यावर गेल्या पाच आठवड्यापासून उपचार चालू आहेत. थेरेपी शिवाय ते सर्व कामे व्यवस्थित करू शकतात. चॅपेल लवकरच या रोगातून पूर्णपणे बरे होऊन ऑगस्टमध्ये सुरु होणाऱ्या एशेज कसोटी सामन्यात समालोचन करताना दिसून येतील.

चॅपल यांनी त्यांना झालेल्या कॅन्सरची माहिती देताना सांगितले की, मी सर्व लोकांना ही माहिती दिलेली नाही कारण मला अंदाज नव्ह्ता की रेडिओ थेरपी कशी होईल. पण आता थेरपी सुरु झाली आहे आणि त्याचा मला जास्त काही त्रास होत नाही. रात्री थोडा थकवा जाणवतो, थोडी चिडचिड होते पण बाकी सर्व ठीक आहे. चॅपल यांना कॅन्सरचे निदान झाल्यावर ते घाबरून गेले होते पण नंतर त्यांनी आईचे समरण केले आणि त्यातून त्यांना या रोगाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली.

Loading...
You might also like