ऐतिहासिक ! आता ‘तृतीयपंथी’यांनाही मिळणार क्रिकेटच्या संघात जागा, ‘या’ देशाने घेतला सर्वात मोठा निर्णय

सिडन : वृत्तसंस्था – जगभरात तृतीयपंथीयांना मिळणारा मान आणि संधींमध्ये मोठी वाढ होत असताना आता यासंदर्भात ऑस्ट्रलिया बोर्डाने एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. आज (गुरुवारी) ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं नवे नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार आता तृतीयपंथीयांना देखील महिला क्रिकेट संघात जागा दिली जाणार आहे.

द्यावी लागणार टेस्टोस्टेरोन टेस्ट

ऑस्ट्रेलिया बोर्डाचा हा नियम कम्युनिटी क्लबसाठी ही लागू होणार असून या नवीन नियमांनुसार तृतीयपंथीयांना महिला क्रिकेट संघात सामिल होण्यासाठी टेस्टोस्टेरोन ची टेस्ट द्यावी लागणार असून स्वत:ला सिध्द करावे लागणार आहे. यासाठी टेस्टोस्टेरोन ची लेव्हल १० नैनोमोल्स पर लिटर किंवा त्यापेक्षा कमी असणे महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू आणि न्यू साऊथ वेल्स बोर्डानं या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं घेतलेला हा निर्णय स्वागतास्पद आहे. ज्या देशात क्रिकेटला खुप महत्त्व दिले जाते, त्या देशात असे निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. हा खेळ सर्वांसाठी आहे, हे यामुळं सिध्द होते”, असे न्यू साऊथ वेल्स बोर्डानं सांगितले.

क्रिकेट हा खेळ सर्वांसाठी

‘ट्रांसजेंडर डाइवर्स पॉलिसी खुप महत्त्वाची आहे असून या निर्णय अंमलात आणण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हा खेळ सर्वांसाठी आहे असून आम्हाला ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा अभिमान आहे. आनंद होत आहे की, असा धाडसी निर्णय घेतला गेला’ असे न्यू साऊथ वेल्स बोर्डाने सांगितले.
दरम्यान क्रिकेटप्रेमींकडून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असताना दिसत आहे.

आरोग्यविषयक वृत्त