‘स्टीव स्मिथ’ आणि ‘डेविड वॉर्नर’मुळं आमने-सामने आल्या 2 IPL टीम, केले मजेदार कॉमेंट्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षी बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळलेले डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहेत. डेव्हिड वॉर्नर याने नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपमध्ये देखील आपल्या शानदार फटकेबाजीने सर्वांचे मनोरंजन केले होते. तर स्मिथ याने ऍशेस मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे काढली होती. त्यानंतर आता नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत देखील दोघांनी स्फोटक फलंदाजी केली. डेविड वॉर्नर तर संपूर्ण मालिकेत एकदाही बाद झाला नाही आणि त्याने या मालिकेतील टीन सामन्यांत 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली.

या दोघांनी या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात 117 धावांची नाबाद भागीदारी केली होती. त्यांच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नऊ विकेट राखून विजय मिळवला होता. सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये नाबाद 100 आणि नाबाद 60 धावांची खेळी करणाऱ्या वॉर्नर याने तिसऱ्या सामन्यात देखील नाबाद 57 धावांची खेळी केली. यामुळे आयपीएलमधील या दोघांचे संघ सोशल मीडियावर भिडले असून या दोन्ही संघानी एकमेकांची मोठ्या प्रमाणात मस्करी केली. राजस्थान रॉयल्सने स्मिथचा एरन फिंच बरोबरचा एक फोटो ट्विट करत म्हटले कि, डेविड वॉर्नरला सांग आज मला फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर सनरायजर्स हैदराबादने देखील यावर उत्तर देताना म्हटले कि, जर दोघांनी एकत्र फलंदाजी केली तर काय मजा येईल ? त्यानंतर राजस्थानाने देखील हैदराबादची मजा घेत विचारले कि, तुम्ही वॉर्नरला रिलीज करत आहात?

दरम्यान, स्मिथ आणि वॉर्नर दोघेही आपल्या संघासाठी स्टार खेळाडू असून 2019 च्या आयपीएलमध्ये राजस्थानचे नेतृत्व अजिंक्य रहाणे याने केले होते. तर वॉर्नरने देखील कधीकाळी सनरायजर्सचे नेतृत्व केले आहे. त्याच्या कर्णधार पदाच्या कारकिर्दीत 2016 मध्ये संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. वॉर्नरने आयपीएलमध्ये 126 सामन्यांत 3305 धावा केल्या असून स्मिथ याने 81 सामन्यांत 1568 धावा केल्या आहेत.

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार