अबब : क्रीडा पत्रकाराच्या एका चुकीमुळं आणि 500 रूपयांच्या बिअरसाठी मोजावे लागले 49 लाख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ऍशेस मालिकेचे वार्तांकन करण्यासाठी इंग्लंडला गेलेल्या एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराला एक बिअर चांगलीच महागात पडली आहे. या पत्रकाराला या बिअरसाठी लाखो रुपये मोजावे लागले. पीटर लेलोर असे या ऑस्ट्रेलियन क्रिकेट पत्रकाराचे नाव असून त्याला एका बिअरसाठी 99,983.64 ऑस्ट्रेलियन डॉलर इतके बिल देण्यात आले. ऑस्ट्रेलियन चलनात ते जवळपास 49 लाख रुपये होतात. मात्र त्यांच्या हे लक्षात येण्याआधी त्यांनी ती बिलाची रक्कम भरली देखील होती. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियाद्वारे हि माहिती या गोष्टीचा खुलासा केला.

मँचेस्टरच्या मॉलमेसन हॉटेलमधील प्रकार
पीटर लेलोर हे मँचेस्टरमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्याचे वार्तांकन करण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी हॉटेलमध्ये थांबले असताना त्यांनी तेथे एक बिअर मागवली होती. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर या घटनेची माहिती देताना लिहिले कि, हि इतिहासातील सर्वात महाग बिअर आहे. मी यासाठी जवळपास 49 लाख रुपये चुकते केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी बाटलीचा आणि ग्लासचा फोटोदेखील शेअर केला आहे. त्याचबरोबर या बिअरची खरी किंमत हि 5.50 पाउंड म्हणजेच 9.91 ऑस्‍ट्रेलियन डॉलर इतकी होती. तिची भारतीय रुपयांमध्ये किंमत हि 486 रुपये होते.

चष्मा न घालण्याचा परिणाम
पीटर यांनी सांगितले कि, त्यांनी ज्यावेळी हे बिल दिले त्यावेळी चष्मा घातला नव्हता. त्याचबरोबर त्यांनी पुढे म्हटले कि, यातून मला बिल देताना नेहमी चष्मा घालावा हा धडा मिळाला. या प्रकरणी या हॉटेलची चौकशी करण्यात येत आहे.

You might also like