भारतीय खेळाडूंना मोठा झटका ! BCCI रद्द करणार 3 मोठ्या टूर्नामेंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे जीवाचेच नव्हे, तर खेळाचेही मोठे नुकसान झाले आहे. भारतात क्रिकेटवर कोरोनामुळे अतिशय वाईट परिणाम झाला आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या सतत वाढत आहे आणि सध्या याचा काहीही अंदाज लागत नाही की, अखेर भारतात क्रिकेट केव्हापासून सुरू होणार, क्रिकेट सुरू होण्याची गोष्ट तर नंतरची आहे, आता बीसीसीआयने कोरोनामुळे तीन मोठ्या टूर्नामेंटचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही अनेक तरूण खेळाडूंसाठी निराशाजनक बातमी आहे.

यावर्षी होणार नाही या टूर्नामेंट्सचे आयोजन
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार बीसीसीआयने तीन मोठ्या टूर्नामेंट रद्द करण्याचा निर्णय रद्द केला आहे. कोरोनामुळे बीसीसीआयने दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन न करण्याचा विचार केला आहे. परंतु, बीसीसीआयने रणजी ट्रॉफी योग्यवेळी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रणजी ट्रॉफीचे आयोजन जानेवारी 2021मध्ये होईल. रिपोर्टनुसार बीसीसीआय रणजी ट्रॉफीच्या सुरूवातीच्या मॅचची संपूर्ण रूपरेषा तयार करणार आहे, जेथे संघांना कलस्टर झोनमध्ये विभागण्यात आले होते. असे म्हटले जातेय की, यावेळी झोननुसार संघ आपसात खेळतील. प्रत्येक झोनचा विजेता पुढील टप्प्यात पोहचेल जो नॉकआउट असेल.

खेळाडूंमुळे रणजी ट्रॉफीचे आयोजन जरूरी
बीसीसीआय अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, आयपीएलनंतर रणजी ट्रॉफीमधूनच भारतीय स्थानिक खेळाडू जास्त पैसे कमावतात आणि यासाठी त्यांची आर्थिक स्थिती योग्य ठेवण्यासाठी या टूर्नांमेंटचे आयोजन करणे जरूरी आहे. एका निकटवर्तीय सूत्राने सांगितले की, आयपीएलशिवाय क्रिकेटर दुसर्‍या कोणत्याही स्थानिक टूर्नामेंटमध्ये जास्त कमावत नाहीत. रणजी ट्रॉफीमध्ये त्यांना पैसा मिळतो. आयपीएलमध्ये 8 संघ खेळतात आणि रणजीमध्ये 38 संघ. रणजी सीझनमध्ये खेळाडू 10 ते 12 लाख रुपये कमावतात आणि काही असोसिएशन तर खेळाडूंसह स्पॉन्सरचे पैसे सुद्धा वाटतात. हे अनेक खेळाडूंसाठी उपजिविकेचे साधन आहे, यासाठी रणजी ट्रॉफीचे आयोजन जरूरी आहे. इंग्लंड आणि वेस्टइंडीजचे संघ मॅच खेळण्यासाठी उत्सुक असतात आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, पाकिस्तानच्या संघांनी सराव मॅचला सुरूवात केली आहे. भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू अजून घरातच आहेत आणि कुणालाही माहित नाही की संघाचा ट्रेनिंग कॅम्प कधी सुरू होणार. खरंच भारतीय क्रिकेटवर कोरोनाचा अतिशय प्रतिकुल परिणाम झाला आहे.