IND vs NZ : न्यूझीलंड विरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी झाली ‘टीम इंडिया’ ची घोषणा, तब्बल 15 महिन्यांनी ‘या’ खेळाडूनं केलं ‘कमबॅक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआय (BCCI) ने मंगळवारी भारतीय टीमची घोषणा केली आहे. टीम मध्ये खूप दिवसांनी पृथ्वी शॉ ची वापसी झाली आहे तसेच इशांत शर्माला फिटनेस टेस्ट पास करण्याच्या अटीवर टीममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी पासून या मालिकेची सुरुवात होणार असून पहिला सामना २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा सामना २९ फेब्रुवारी पासून ४ मार्च पर्यंत क्राईस्टचर्च येथे खेळण्यात येणार आहे.

भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली तर उपकप्तान अजिंक्य रहाणे असणार आहे. रोहित शर्माला जखम झाल्यामुळे हिटमॅन संघाच्या बाहेर झाला आहे. तसेच केएल राहुलला देखील या मालिकेत संधी मिळालेली नाही. विशेष म्हणजे टी – २० मालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या नवदीप सैनीला पहिल्यांदाच टीम मध्ये संधी देण्यात आली आहे.

१५ महिन्यांनंतर पृथ्वी शॉने केली वापसी
पृथ्वी शॉने डोपिंगमुळे आठ महिन्यांच्या बंदीनंतर घरेलू क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले होते. शॉने बंदीनंतर आपल्या पहिल्या सामन्यात सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आसाम च्या विरुद्ध ३९ चेंडूंवर ६३ रनांची शानदार पारी खेळली. तसेच या टुर्नामेंटमध्ये त्याने अजून दोन अर्धशतक आपल्या नावावर केले. पृथ्वी शॉने ३० लिस्ट ए सामन्यांमध्ये ४३.३३ च्या सरासरीने आणि ११९.३७ च्या स्ट्राइक रेटने १३०० धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे.

शॉने आपला अखेरचा कसोटी सामना १२ ऑक्टोबर ला वेस्टइंडीज च्या विरुद्ध हैदराबाद येथे खेळला होता. याच मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याने डेब्यू केला होता. यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील समाविष्ट करण्यात आले होते परंतु सामन्याच्या आधीच तो जखमी झाला आणि त्या कारणामुळे त्याला हा दौरा रद्द करावा लागला होता.

टीममध्ये समाविष्ट होतील तीन ओपनर
कसोटी मालिकेत रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या गैरहजेरीत भारताकडे मयंक अग्रवाल, शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ असे तीन सलामीवीर असणार आहेत.

भारतीय टीम – विराट कोहली (कप्तान), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे (उपकप्तान), हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि ईशांत शर्मा आदींचा समावेश टीममध्ये करण्यात आला आहे.