BCCI कडून टीम इंडियाला दिवाळी गिफ्ट ! आता मिळणार ‘दुप्पट’ पैसे, ‘या’ सर्वांची होणार ‘चांदी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना बीसीसीआयने एक गिफ्ट दिले आहे. दिवाळीच्या तोंडावर दिलेल्या या गिफ्टमुळे खेळाडूंची दिवाळी आणखी गोड होणार आहे. प्रशासकीय समितीने भारतीय खेळाडूंच्या विदेशी दौऱ्यामध्ये मिळणाऱ्या दैनिक भत्त्यात दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे आता विदेश दौऱ्यावर खेळाडूंना दररोज 250 डॉलर मिळणार आहेत. त्याचबरोबर घरगुती मालिकेत देखील हा भत्ता वाढणार आहे.

घरगुती मालिकांमध्ये देखील वाढला भत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये पार पडलेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत यावर निर्णय झाला. त्यामुळे भारतात होणाऱ्या सामन्यासाठी आतापर्यंत 100 डॉलर भत्ता मिळत असे. मात्र आता दररोज 7500 रुपये भत्ता खेळाडूंना मिळणार आहे.

सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीची देखील चांदी
भारतीय खेळाडूंना मिळणार हा भत्ता त्यांच्या इतर सुविधांपेक्षा वेगळा आहे. कपडे धुण्याचा खर्च तसेच राहण्याची व्यवस्था यांसारखा खर्च हा बीसीसीआयचा असतो. त्यामुळे निवड समितीच्या सदस्यांचा देखील भत्ता वाढला आहे. त्यांना आता दररोज सात हजार रुपये भत्ता मिळणार आहे. तसेच महिला खेळाडूंना देखील याचा फायदा मिळणार आहे.

सामन्याची रक्कम आणि करार रक्कम वेगळी
हा भत्ता खेळाडूंच्या सामन्यांच्या मानधनापेक्षा वेगळा आहे. खेळाडूंना एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये तर टी-२० सामन्यासाठी 3 लाख रुपये देत असते. तसेच या वेतनबरोबरच करारानुसार ठरलेली रक्कम देखील प्रत्येक वर्षी खेळाडूंना मिळत असते.

Visit – policenama.com 

You might also like