क्रिकेटच्या चाहत्यांसाठी खुशखबर ! गांगुली घेणार ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटमध्ये अनेक नवीन गोष्टी आणण्यासाठी प्रयत्न केले जाताहेत त्यासाठी अनेक नवीन निर्णय देखील घेतले जात आहेत डे नाईट कसोटी सामने सुरु करत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एक मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता गांगुलीकडून भारतीय क्रिकेटप्रेमींना आणखी एक सरप्राइझ मिळणार आहे.

टी २० मध्ये आयपीएलची लोकप्रियता सर्वाधिक आहेत त्यामुळे हे संघ बाहेर देशात जाऊन देखील क्रिकेट खेळू शकतील अशी चर्चा असताना बीसीसीआय मिनी आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्याच्या विचारात आहे. ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

चॅम्पियन लीग सध्या बंद असल्यामुळे त्या वेळेत मिनी आयपीएल या स्पर्धेचं आयोजन केलं जाऊ शकत यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. चॅम्पियन लीग स्पर्धा सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात १५ ते २० दिवसांसाठी आयोजित केली जात असे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिना चॅम्पियन लीगसाठीचा होता. तो आता मोकळा मिळणार असल्याने बीसीसीआय आणखी एक आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत आहे अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

२०१४ नंतर चॅम्पियन्स लीग स्पर्धा बंद करण्यात आली होती त्यामुळे आता आयपीएलच्या गर्व्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत नव्या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर बीसीसीआयच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

आयपीएलचे संघ खेळणार परदेशात
आयसीसीशी संलग्न देशांसोबत आयपीएलच्या संघांचे सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आयपीएलमधील संघ अन्य देशात सामने खेळतील याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली. यामुळे आयपीएलची लोकप्रियता आणखी वाढेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/