Coronavirus Impact : ‘कोरोना’ व्हायरसच्या कारणामुळं BCCI चं ऑफिस बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2020 स्थगित झाल्यानंतर आता जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड बीसीसीआयचे कार्यालयाही बंद होत आहे. मंगळवारपासून बीसीसीआयचे कार्यालय बंद करण्यात येईल. कार्यालयातील सर्व कर्मचारी घरूनच काम करणार आहेत. भारतात कोरोना व्हायरसचे 114 रूग्ण सापडले आहेत आणि दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात या व्हायरसमुळे तब्बल 5 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

क्रिकेटवर कोरोना व्हायरसचा साईड इफेक्ट
क्रिकेटला कोरोना व्हायरसचा जोरदार फटका बसला आहे. क्रिकेटची प्रत्येक मोठी सीरीज आणि टूर्नामेंट या महामारीमुळे रद्द किंवा स्थगित करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठी लीग आयपीएलसुद्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तर भारत आणि साऊथ अफ्रिका वनडे सीरीजसुद्धा कोरोना व्हायरसमुळे रद्द करावी लागली आहे. इंग्लंडने सुद्धा श्रीलंका दौरा रद्द केला. तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमधील वनडे सीरीज सुद्धा रद्द करावी लागली आहे. क्रिकेट साऊथ अफ्रीकाने सुद्धा आपल्या सर्व स्थानिक मॅच पुढील दोन महिन्यांसाठी रद्द केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक टूर्नामेंट शेफील्ड शील्ड आणि न्यूझीलँडच्या स्थानिक टूर्नामेंट प्लंकेट शील्ड सुद्धा कोरोना व्हायरसमुळे रद्द झाल्या आहेत. तर भारतात होणार्‍या स्थानिक टूर्नामेंट सुद्धा रद्द केल्या गेल्या आहेत. आता आयपीएलसुद्धा रद्द झाल्याचे वृत्त लवकरच येऊ शकते.

आयपीएल फ्रेंचायजी टूर्नामेंट रद्द झाल्याची बातमी ऐकण्यासाठी तयार
एकीकडे सर्व आयपीएल टीमने आपले प्रॅक्टिस सेशन रद्द केले आहे, तर दुसरीकडे वृत्त असेही आहे की, सर्व फ्रेंचायजिंनी आयपीएल रद्द झाल्याची बातमी ऐकण्यासाठी स्वताला तयार केले आहे. म्हणजे प्रत्येक टीमला आता असेच वाटत आहे की, आता आयपीएल रद्दच होणार. कोरोना व्हायरसमुळे सर्व शाळा, कॉलेज, मॉल, थिएटर, जिम बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत आयपीएल होणे अवघड असल्याचे दिसत आहे.