Advt.

‘या’ बड्या क्रिकेटरला पत्नीनं दिली ‘धमकी’, रन नाही केले तर घरी येऊ नकोस म्हणून सांगितलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुरुवारी खेळल्या गेलेल्या बिग बॅश लीग सामन्यात ब्रिसबेन हीटने होबार्ट हरीकेंस विरुद्ध 5 गडी राखून विजय मिळविला. ब्रिसबेनच्या विजयामुळे त्यांचा ऑलराऊंडर बेन कटिंगने शानदार प्रदर्शन केले. या खेळाडूने कठीण वेळी 29 चेंडूंत नाबाद 43 धावा फटकावल्या आणि त्यापूर्वी गोलंदाजीत मॅथ्यू वेडची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल कटिंगला सामनावीराचा पुरस्कार जाहीर झाला. महत्वाची गोष्ट म्हणजे सामन्यानंतर कटिंगला त्याची पत्नी एरिन हॉलंडने धमकी दिली.

बेन कटिंगची पत्नी एरिन हॉलंड एक टीव्ही अँकर आहे. गुरुवारी सामना संपल्यानांतर तिने आपल्या पतीशी चर्चा केली. सर्व प्रथम हॉलंडने त्याचे आभार मानले की, पहिल्यांदा त्यांचे ऐकून चांगल्या धावा केल्या. त्याच वेळी, बेन कटिंगशी जेव्हा त्याचे संभाषण पूर्ण झाले तेव्हा हॉलंड म्हणाली, “आराम करा, पर्थमध्ये चांगले खेळ नाहीतर घरी येऊ नको .” पत्नीचे म्हणणे ऐकल्यानंतर कटिंगने हसण्यास सुरुवात केली आणि या दोघांच्या संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान, ब्रिसबेन हीटला त्यांचा पुढील सामना पर्थमध्ये पर्थ स्कॉर्चर्सविरूद्ध खेळायचा आहे.

कोण आहे एरिन हॉलंड :
बेन कटिंगची पत्नी एक टीव्ही होस्ट तसेच एक ब्युटी क्वीन, गायक, मॉडेल, डान्सर आहे. एरिन हॉलंडने आयपीएल 2018 मध्ये देखील अँकरिंग केले होते. एरिन हॉलंडने 2013 साली मिस वर्ल्ड ऑस्ट्रेलियाचे विजेतेपद जिंकले आहे.

तसेच बेन कटिंग हा टी २० फॉर्मेटचा तज्ज्ञ खेळाडू मानला जातो, तो जगभर टी -२० लीगमध्ये खेळतो. मात्र, यावेळी आयपीएलच्या बोलीमध्ये त्याच्या विक्री लागली नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून बेन कटिंगने 21 सामने खेळले आहेत. कटिंगने ऑस्ट्रेलियाकडून 4 एकदिवसीय सामने आणि 7 टी -20 सामने देखील खेळले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/