बेन स्टोक्स वरून ICC नं ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनची केली ‘घोर’ थट्टा, पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बेन स्टोक्स हा इंग्लंडचा सध्याचा सर्वात भरोसेमंद खेळाडू असून नुकत्याच झालेल्या ऍशेसमधील तिसऱ्या कसोटी सामन्यातील त्याच्या जिगरबाज खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने या सामन्यात केलेल्या नाबाद 135 धावांच्या जोरावर इंग्लंडने अशक्यप्राय विजय खेचून आणला होता. त्याच्या या कामगिरीमुळे जगभरातून त्याचे कौतुक होताना दिसून येत आहे. अनेक माजी खेळाडूंनी त्याचे या खेळीबद्दल कौतुक केले. त्याचबरोबर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने त्याला इंग्लडचा मानाचा नाईटहूड किताब देण्याची देखील मागणी केली. त्यानंतर आता आयसीसीने देखील स्टोक्सविषयी एक ट्विट केले आहे.

मात्र आयसीसीने केलेल्या या ट्विटमध्ये भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याची थट्टा करण्यात आली आहे. या ट्विटमध्ये आयसीसीने बेन स्टोक्स याला जगातील महान फलंदाज म्हणून संबोधले आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांनी या ट्विटचा खरपूस समाचार घेत नाराजी व्यक्त केली आहे. स्टोक्स याने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात शानदार 84 धावांची खेळी करत इंग्लंडला विजेतेपद पटकावण्यास मदत केली होती. त्यानंतर आयसीसीने दोघांचा फोटो ट्विट करत म्हटले होते कि, जगातील महान खेळाडूबरोबर सचिन तेंडुलकर.

दरम्यान, आजदेखील आयसीसीने हा फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये लिहिले आहे कि, आम्ही अगोदरच म्हटले होते कि, स्टोक्स हा जगातील महान खेळाडू आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा सचिनच्या चाहत्यांनी आयसीसीला फैलावर घेतले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि, स्टोक्स हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, मात्र त्याला जगातील महान क्रिकेटर म्हणणे बरोबर नाही.

आरोग्यविषयक वृत्त –