ज्या क्रिकेटरमुळं वर्ल्डकप हातातून ‘निसटला’ त्याचाच न्यूझीलंड ‘सन्मान’ करणार !, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या बेन स्टोक्स याने शानदार कामगिरी करत आपल्या संघासाठी हिरो ठरला. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा वर्ल्डकप चॅम्पियन झाला. मात्र न्यूझीलंडचे समर्थक त्याला व्हिलन म्हणत आहेत. मात्र याच न्यूझीलंडमध्ये बेन स्टोक्सला सर्वात मोठा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. यासाठी त्याला ऑफ द इयर अवार्ड पुरस्कारासाठी नॉमिनेट केले आहे.

का झाला नॉमिनेट?

न्यूझीलंडच्या ऑफ द इयर अवार्डसाठी नॉमिनेट करताना न्यूझीलंडचे चीफ जज कैमरॉन बेनट यांनी सांगितले कि, तो भलेही इंग्लंडसाठी खेळत असला तरी येथील नागरिक त्याला पसंद करतात. येथील नागरिकांमध्ये तो मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. या पुरस्कारासाठी १० खेळाडूंना यासाठी नॉमिनेट करण्यात आले असून यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याचा देखील समावेश आहे. डिसेंबरमध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

स्टोक्सचे न्यूझीलंड कनेक्शन

बेन स्टोक्सचा जन्म न्यूझिलंडमधील क्राइस्टचर्चमध्ये झाला. वयाच्या १२ व्या वर्षी तो इंग्लंडमध्ये आला. त्याचे वडील गेराल्ड रग्बी लीग खेळत असत. ते प्रशिक्षणासाठी इंग्लंडला आले होते. त्यानंतर स्टोक्सचे आई वडील न्यूझीलंडला परत गेले, मात्र स्टोक्स इंग्लडमध्येच राहिला.

वर्ल्ड कप हीरो
अष्टपैलू बेन स्टोक्सने फायनलमध्ये ८४ धावांची शानदार खेळी करत इंग्लंडला विजयाच्या जवळ आणून ठेवले. सुरुवातीला त्याने सामना टाय करण्यात महत्वाची भूमिका बजावली. तर सुपर ओव्हरमध्ये देखील त्याने शानदार खेळी केली. या स्पर्धेत त्याने ६६. ४२ च्या सरासरीने ४६५ धावा केल्या.

नाइटहुड किताबाचा प्रबळ दावेदार

विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या बेन स्टोक्स याला नाइटहुड किताबाचा देखील प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. जर स्टोक्सला हा किताब मिळाला तर तो हा ‘किताब पटकावणारा १२ वा क्रिकेटर ठरेल. याआधी २०१९ मध्ये अलेस्टर कुक याला हा किताब देण्यात आला आहे.