न्यूझीलंड दौऱ्यापूर्वीच ‘टीम इंडिया’ला मोठा ‘धक्का’, दुखापतीनं ‘या’ ओपनरनं घेतली माघार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियाने आपल्या घरच्या मैदानावर श्रीलंका (ट्वेंटी – 20) आणि ऑस्ट्रेलिया (वन डे) यांचा पराभव करून आपला फॉर्म टिकवून ठेवला आहे. आता टीम इंडिया २०२० मध्ये पहिल्यांदाच परदेश दौऱ्यासाठी म्हणजेच न्यूझीलंडला रवाना झाली आहे. पण या दौऱ्यापूर्वीच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे.

इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शिखर धवनला दुखापत झाली होती आणि तिसऱ्या सामन्यात त्या दुखापतीत वाढ झाली त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर शिखर धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आणि रोहित शर्माला ओपनिंग करावी लागली. त्यामुळे आता न्यूझीलंडच्या मालिकेत शिखर धवनला माघार घ्यावी लागली आहे.

न्यूझीलंड आणि इंडियाच्या ट्वेन्टी – २० मालिकेला २४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. धवन नसल्याने ट्वेन्टी – २० संघात संजू सॅमसन, मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांच्यापैकी एकाला संधी देण्यात येण्याची चिन्ह आहेत. हे तिघेही सध्या भारत अ संघासोबत न्यूझीलंडमध्येच आहेत. पृथ्वी शॉनं दुखापतीतून सावरताना न्यूझीलंड एकादश संघाविरुद्ध १०० चेंडूंत तब्बल १५० धावांची खेळी नुकतीच केली आहे. त्यामुळे तो सध्या फॉर्ममध्ये आहे.

भारताचा संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर.

न्यूझीलंडचा संघ – केन विलियम्सन (कर्णधार), हामिश बेन्नेट, टॉम ब्रूस, कॉलिन डी ग्रँडहोम (पहिल्या तीन सामन्यांसाठी), मार्टिन गुप्तील, स्कॉट कुग्गेलेन, डॅरील मिचेल, कॉलीन मुन्रो, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर, मिचेल सँटनर, टीम सेईफर्ट (यष्टिरक्षक), इश सोढी, टीम साऊदी.

न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक

ट्वेंटी-२० मालिका
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २४ जानेवारी, दुपारी १२.३० वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २६ जानेवारी, दुपारी १२.३० वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २९ जानेवारी, दुपारी १२.३० वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड – ३१ जानेवारी, दुपारी १२.३० वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २ फेब्रुवारी, दुपारी १२.३० वा.

वन डे मालिका
भारत विरुद्ध न्यूझीलंड – ५ फेब्रुवारी, सकाळी ७.३० वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड – ८ फेब्रुवारी, सकाळी ७.३० वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड – ११ फेब्रुवारी, सकाळी ७.३० वा.

कसोटी मालिका
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २१ ते २५ फेब्रुवारी, पहाटे ४ वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २९ फेब्रुवारी ते ४ मार्च, पहाटे ४ वा.

फेसबुक पेज लाईक करा –