ब्रायन लारा T-20 खेळण्यासाठी उतरला पुन्हा मैदानात, केल्या ‘इतक्या’ धावा ! (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा 19 एप्रिल 2007 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. 2016 मध्ये त्याने मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये भाग घेतला होता, तर मागील वर्षी तो अमेरिकेत झालेल्या क्रिकेट ऑल स्टार्स सीरिजमध्येही खेळला होता. आता त्रिनिडाडचा ब्रायन लारा पुन्हा मैदानात फलंदाजीस उतरला आहे.

हा सामना ब्राव्हो इलेव्हन आणि पोलार्ड इलेव्हन यांच्यात झाला. यामध्ये ब्राव्हो इलेव्हनच्या वतीने फलंदाजीस उतरलेल्या ब्रायन लाराने आपल्या सुप्रसिद्ध शैलीत लेट कटद्वारे शानदार चार धावा केल्या. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या ब्रायन लाराला आपला डाव फार लांब नेता आला नाही आणि तो केवळ 12 धावांत बाद झाला. पण त्याचा आवडता लेट कट शॉट पाहून स्टेडियमच्या प्रेक्षकांनी त्याचे दमदार स्वागत केले.

पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या गेलेल्या या प्रदर्शन सामन्यात ब्राव्हो इलेव्हनच्या संघात ब्रायन लारा, सुनील नरेन, लेंडल सिमन्स आणि स्वत: ब्राव्होचा समावेश होता. त्याचप्रमाणे, कायरन पोलार्डच्या संघात दिनेश रामदिन, जिमी निशाल, सेकुगे प्रसन्ना आणि खैरी पियरे यासारख्या खेळाडूंचा समावेश होता. ब्रायन लाराने आपल्या कारकीर्दीत 131 कसोटी सामने 11953 धावा केल्या. त्याने सर्वाधिक नाबाद 400 धावा केल्या तर त्याने 34 शतकेही ठोकली. लाराने 299 एकदिवसीय सामन्यात 10405 धावा केल्या. या स्वरुपात त्याची सर्वाधिक धावसंख्या 169 धावा होती. त्याच्या नावावर 19 एकदिवसीय शतकेही आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –