न्यूझीलंडच्या ‘या’ बॉलरचा आगळा-वेगळा ‘कारनामा’, ‘हॅट्रिक’सह 9 बॉलमध्ये घेतले 5 बळी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक जमाना होता ज्यावेळी हॅट्रिक ही खूप मोठी गोष्ट समजली जात असे,परंतु आता एक गोष्ट साधारण झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगमध्ये रशीद खान आणि हॅरिस रऊफच्या हॅट्रिक नंतर गुरुवारी न्यूझीलंडमध्ये देखील एका गोलंदाजाने हॅट्रिक मिळवली. विल विलियम्स नावाच्या धीम्या गतीच्या गोलंदाजाने वेलींग्टन विरुद्ध सलग तीन चेंडूंवर तीन फलंदाजांना बाहेर पाठवले. एवढेच नाही तर पुढील ओव्हरमध्ये दोन आणखी फलंदाजांना बाद करत आपल्या संघाला तीन धावांनी विजय मिळवून दिला.

विल विलियम्स ची हॅट्रिक
149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेलिंग्टनची टीम सहज जिंकत चालली होती 17 षटकांनंतर त्याची धावसंख्या 4 विकेट गमावून 126 धावा एवढी होती. जिंकण्यासाठी त्यांना 18 चेंडूत फक्त 23 धावांची गरज होती आणि त्याच्याकडे 6 विकेट बाकी होत्या. यानंतर विल्यम्सने आपली जादू दाखवत सर्व सामनाच फिरवला.

18 व्या षटकातील चौथ्या बॉलवर कॉलसनला विल विल्यम्स बोल्ड केले. पुढच्या बॉलवर विल्यम्सने बोसच्या हाती जॉन्सला झेलबाद केले. यानंतर त्याने स्वत: च्या बॉलवर गिब्सनचा झेल घेत हॅटट्रिक पूर्ण केली. आता वेलिंग्टनची धावसंख्या 7 बाद 130 अशी होती आणि आता त्यांना विजयासाठी 12 चेंडूंत 19 धावांची गरज होती.

शेवटच्या शतकात देखील घेतल्या 2 विकेटस
सामन्यातील शेवटची ओव्हर देखील विलियम्सला देण्यात आली यावेळी प्रतिस्पर्ध्यांना 12 धावांची आवश्यकता होती. दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाने चौकार मारला आत्ता चार चेंडूंमध्ये सात धावांची आवश्यकता होती. पुढील दोन चेंडूवर तीन धावा काढण्यात वेलिंग्टनच्या फलंदाजांना यश आले. मात्र पुढील दोन चेंडूंवर सलग दोन फलंदाजांना बाद करत तीन धावानी विलियम्सने संघाला यश मिळवून दिले.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/