Coroanvirus : क्रिकेटर केविन पीटरसननं हिंदीमध्ये केलं ट्विट, म्हणाला – ‘भारतीयांनो सावध रहा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे भारतासह जगभरात काळजीचे वातावरण आहे. क्रीडा क्षेत्रात देखील याचा फटका बसला आहे. क्रिकेट, फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. चीन आणि अन्य देशात पसरलेला कोरोना आता भारतात देखील आला आहे. देशातील अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर लागून राहिले आहे. अशातच इंग्लंडच्या एका क्रिकिटपटूने भारतासाठी खास संदेश दिला आहे.
https://twitter.com/KP24/status/1240903502345486336
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हीन पीटरसन याने एक ट्विट केले आहे. या ट्विटची सध्या इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे त्याने रोमन हिंदीमध्ये ट्विट केले आहे आणि या ट्विट साठी त्याने त्याचे हिंदी शिक्षक श्रीवत्स गोस्वामी यांचे आभार मानले आहेत.
https://twitter.com/KP24/status/1240903502345486336
पीटरसनने केलेल्या ट्विटमध्ये लिहले आहे, नमस्ते इंडिया, कोरोना व्हायरसचा पराभव करण्यासाठी आपण सर्वजण एक साथ आहोत. आपण सर्वांनी आपल्या देशातील सरकारांनी सांगितल्या प्रमाणे काही दिवस घरात थांबायचे आहे. ही वेळ सावध होण्याची आहे. तुम्हा सर्वांना भरपूर प्रेम, असे पीटरसनने लिहले आहे. शेवटी त्याने माया हिंदी टीचर असे लिहून श्रीवत्स गोस्वामी यांना टॅग केले आहे.

पीटरसनच्या या ट्विटवर श्रीवत्स गोस्वामी यांनी उत्तर दिले आहे. तुम्ही फार वेगाने शिकणाऱ्यापैकी आहेत. पुढच्यावेळी तुम्ही हिंदीमध्ये व्हिडिओ शुट कराल, असे गोस्वामी यांनी म्हटले आहे. पीटरसन आणि गोस्वामी यांच्या ट्विटरवर क्रिकेट प्रेमींकडून प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी पीटसरनचे कौतुक केले आहे तर काहींनी त्याची चेष्टा केली आहे.