यंदाच्या वर्षी IPL होणार नाही ? सौरव गांगुलीनं दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात दहशत माजवली आहे. क्रिडा विश्वात देखील याचा परिणाम पाहायला मिळाला. यामुळे अनेक टूर्नामेंट रद्द करण्यात आल्या आहेत. हा व्हायरस आता भारतात येऊन धडकला आहे. यानंतर आता आयपीएल (IPL) देखील रद्द करण्यावर चर्चा सुरु झाली आहे.

एका वृत्तानुसार बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले की टूर्नामेंट नियोजित वेळी ठरलेल्या शेड्यूलनुसार होईल. ते पुढे म्हणाले, बोर्ड व लीगने या धोक्यापासून वाचण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहे. आयपीएलचा 13 वी हंगाम 29 मार्चपासून सुरु होत आहे. यात पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळवला जाईल.

वृत्तानुसार भारतात आतापर्यंत 30 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. BCCI केंद्र सरकारच्या काही शिफारसींवर मार्गदर्शक तत्व जारी करण्याचा विचार करत आहे. ही मार्गदर्शक तत्व खेळाडू, एअरलाइन कंपन्या, संघाचे हॉटेल, ब्रॉडकास्ट क्रू आणि आयपीएल आयोजनशी संबंधित आहे. बीसीसीआयची यावर पूर्ण नजर आहे. आयपीएल गव्हिर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष बृजेश पटेल म्हणाले, आयपीएलच्या पूर्वी टीम इंडियाला साऊथ अफ्रिकेच्या विरोधात वन डे सीरिज खेळावी लागेल. भारतीय संघ 12 ते 18 मार्च दरम्यान साऊथ आफ्रिकेच्या विरोधात तीन वन डेची मालिका खेळेल.

सगळीकडे टूर्नामेंट सुरु आहेत –
गांगुली म्हणाले की आयपीएल पूर्वी निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसारच होईल. सगळीकडे टूर्नामेंट सुरु आहेत. इंग्लंडचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. दक्षिण अफ्रिकेचा संघ येथे आहे. काऊंटी संघ जगभरात प्रवास करत आहे. गांगुली म्हणाले की काऊंटी टीम खेळण्यासाठी अबुधाबी, यूएई जात आहे. यात कोणतीही समस्या नाही. खेळाडूंचा सुरक्षेबाबत त्यांनी सांगितले की आम्ही सर्व सावधगिरी बाळगून आहोत.

गांगुली म्हणाले, मेडिकल टीम हॉस्पिटलच्या संपर्कात आहे. जेणे करुन सर्व काही उपलब्ध होऊ शकेल. डॉक्टर जसे सांगतील तसे आम्ही करु, तो त्यांचा पेशा आहे. सर्व वैद्यकीय परिस्थिती मेडिकल टीम पाहते. सर्व टूर्नामेंट नियोजित वेळेत होतील.

क्रिडा मंत्रालयाशी केला संपर्क –
सौरव गांगुली आणि बृजेश पटेल यांनी आयपीएलमध्ये कोरोना व्हायरसच्या धोक्याना नाकारल्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी क्रिडा मंत्रालयाला संपर्क केला. यासाठी एक टेलिकॉन्फरन्स घेण्यात आली. सूत्रांच्या मते सर्व माहिती जमा केली आहे आणि येत्या दोन किंवा तीन दिवसात काही निर्णय घेण्यात येतील. क्रिडा मंत्रालय यात दखल देऊ शकत नाही की इवेंट कुठे आणि कसा आयोजित केले जाईल. बीसीसीआयशिवाय नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया देखील क्रिडा मंत्रालयाशी संपर्कात आहे.