वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरलेल्या ‘या’ क्रिकेटरकडून षटकारांचा ‘पाऊस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन महिन्यानंतर देखील क्रिकेट वर्ल्डकपमधील अंतिम सामना कुणीही अजून विसरला नसेल. या सामन्यात अनेक प्रयत्न करून देखील अखेर न्यूझीलंडला विजय मिळवता आला नव्हता. या संपूर्ण स्पर्धेत न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज कोलिन मनरो याची बॅट तळपली नाही. मात्र सध्या सुरु असलेल्या कॅरिबिअन प्रीमिअर लीगमध्ये त्याची बॅट आग ओकत असून त्याने कालच्या सामन्यात चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली.

ट्रिनबागाे नाइट राइडर्स या संघाच्या वतीने खेळताना त्याने जमैका तलवाहा या संघाच्या विरुद्ध  खेळताना काल 50 चेंडूत नाबाद 90 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीच्या बळावर नाईट रायडर्सने 2 बाद 267 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना जमैका तलवाहाला 226 धावांपर्यंतच मजल मारता आली.

वर्ल्डकपमध्ये गेला फ्लॉप

जून आणि जुलै महिन्यात झालेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मात्र मनरो याचा अजिबात फर्म नव्हता. या स्पर्धेत त्याची सर्वोच्च धावसंख्या हि 58 होती. त्याला या स्पर्धेत केवळ सहा सामने खेळण्याची संधी मिळाली. या संपूर्ण स्पर्धेत त्याला केवळ 116 धावा बनवता आल्या.

दरम्यान, या सामन्यात मनरो बरोबरच किरॉन पोलार्ड याने देखील धडाकेबाज खेळी केली. त्याने 17 चेंडूत 45 धावांची अतिशी खेळी केली. तसेच या सामन्यात लेंडल सिमेन्स याने देखील 42 चेंडूत 86 धावांची खेळी केली.

आरोग्यविषयक वृत्त –