MS धोनी ‘गोत्यात’, आम्रपाली प्रकरणात FIR दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम्रपाली ग्रुप वादात पुन्हा एकदा एम. एस. धोनीचे नाव समोर आले आहे. आता एम. एस. धोनीच्या विरोधात आम्रपाली केसमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 27 नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नवी एफआयआर दाखल केला आहे, ज्यात एम. एस. धोनीचे नाव आहे. आम्रपाली ग्रुपने लोकांकडून 2647 कोटी रुपये जमा करुन दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये लावले आणि त्यानंतर गृह निर्माण प्रकल्प अपूरा सोडला. 2003 मध्ये बनलेल्या आम्रपाली ग्रुपवर लोकांनी पैसे घेऊन त्यांनी घर न देण्याचा आरोप आहे. एम. एस. धोनी आम्रपाली ग्रुपच्या ब्रॅंड अ‍ॅंबेसिडर होता आणि याच कारणाने तो या प्रकरणात अडकला.

नव्या एफआयआरमध्ये धोनीवर लावण्यात आले आहेत आरोप
एका वृत्तानुसार 27 नोव्हेंबरला दाखल एफआयआरमध्ये एम. एस. धोनीवर घर खरेदीदारांकडून आरोप लावले आहेत. त्यात लिहिले आहे की धोनी या ग्रुपचे ब्रॅंड अ‍ॅंबेसिडर होता आणि त्याने आम्रपालीला प्रमोट केले. भारतात धोनीची प्रतिमा पाहून लोकांनी आम्रपाली ग्रुपवर विश्वास ठेवला यामुळे या केसमध्ये धोनीचे नाव देखील आरोपींच्या लिस्टमध्ये आहे.

नवा एफआयआर दाखल करणाऱ्या तक्रारदारांच्या मते, आम्रपालीचे मालक अनिल शर्मा आणि दुसरा संचालक या प्रकरणात आरोपी आहे. परंतू तपास यंत्रणांकडून धोनीची यात काय भूमिका होती याचा देखील तपास व्हावा आणि त्याला देखील या प्रकरणी आरोपी बनवण्यात यावे.

पत्नी साक्षी देखील अडकली आहे वादात
आम्रपाली ग्रुप प्रकरणी जुलैमध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायलयात एक ऑडिट रिपोर्ट सादर केला होता, ज्यानुसार एम. एस. धोनीची पत्नी साक्षी कंपनीच्या 25 टक्क्यांची शेअर मालकीन होती. सरकारी आकडेवारी नुसार सप्टेंबर 2014 पर्यंत अशीच परिस्थिती होती. पुन्हा एकदा या प्रकरणी धोनीचे नाव पुढे आले आहे.

धोनीचे करिअर
सध्या धोनी भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये 90 कसोटी सामन्यात 6 शतक आणि 33 अर्धशतके करत 4876 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 38.09 राहिली. धोनीने 256 झेल आणि 38 स्टंप केले आहे. वनडे क्रिकेटमध्ये धोनीने 350 सामने 10773 धावा केल्या. 50.57 च्या सरासरीने बनवलेल्या धावात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे मध्ये धोनीने 321 झेल आणि 123 स्टंप केले.

कसोटीत त्याची सर्वाधिक धावसंख्या 224 आणि वनडे मध्ये नाबाद 183 धावा आहेत. तर टी – 20 क्रिकेटमध्ये धोनीने 98 सामन्यात 1617 धावा केल्या. त्यात त्याची सरासरी 37.60 राहिली, तर दोन अर्धशतके केली.

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like