शोएब अख्तरकडून पाकिस्तानी क्रिकेटची ‘पोलखोल’ ! ‘या’ हिंदू खेळाडूसोबत जेवण करत नव्हते इतर क्रिकेटर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी संघाचे आणखी एक संतापजनक सत्य क्रिकेट जगासमोर समोर आले आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संघाचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. दानिश कनेरिया हा हिंदू होता, त्यामुळे पाकिस्तानी संघात त्याला चांगली वागणूक दिली जात नव्हती. त्याच्याशी अन्याय केला जात होता, संघातील खेळाडू असेही म्हणत असत कि, दानिश आमच्या बरोबर का जेवण करतो? शोएब अख्तरने हे खुलासे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू असीम कमल आणि राशिद लतीफ यांच्याशी झालेल्या चॅट शो दरम्यान केले. दरम्यान, पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने ६१ कसोटी सामन्यांमध्ये २६१ आणि १८ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५ बळी घेतले आहेत.

ड्रेसिंग रूममध्येच खेळाडूंना केले जाते खराब :
मिळालेल्या माहितीनुसार, या चॅट शो दरम्यान शोएब अख्तरने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, ‘स्टीव्ह वॉ यांनी अँड्र्यू सायमंड्सला वारंवार संधी दिली. दहा वर्षे तो क्रिकेट खेळला. एबी डिव्हिलियर्सने क्विंटन डी कॉकला रिहेबिलिटेशनला पाठविले. तयार केले आणि पहा की ते आज काय करीत आहेत? आमच्या येथे तर खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्येच खराब केले जाते. राशिद लतीफ म्हणाले, ‘युसुफ योहानाला देखील बराच त्रास दिला गेला. तो एक उत्तम खेळाडूही होता. जोहाना मूळचा ख्रिश्चन होता. नंतर त्याने अचानक मुस्लिम धर्म स्वीकारला.’

‘उचलून बाहेर फेकून देईन, कॅप्टन असेल त्याच्या घरचा’
शोएब अख्तरने दानिश कानेरियाविषयी मोठा खुलासा करताना सांगितले की, ‘युसूफच्या नावावर १२ हजार धावा आहेत. पण आम्ही त्याचा कधीच आदर केला नाही. दोन-तीन खेळाडूंशी माझे भांडणदेखील झाले. मी म्हणालो की, कोणी हिंदू असला तरी तो खेळेल. मग त्याच हिंदूने आम्हाला कसोटी मालिका जिंकून दिली. दरम्यान, दानिश कनिरियाच्या संदर्भात शोएब अख्तरने उत्तर दिले की, ‘हे प्रकरण उघडेल. परंतु मला हे सांगायचे आहे की, दानिश कनेरिया आमच्याबरोबर का जेवतो असे काही खेळाडूंनी मला सांगितले.’ यावर मी त्यांना म्हंटलो की, ‘तुम्हाला इथून उचलून बाहेर फेकून देईन. तू कॅप्टन असशील तुझ्या घरचा, तो खेळाडू तुम्हाला ६-६ विकेट्स देत आहे.’

नसीम शहा यांच्या वयावर केली ही टिप्पणी :
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने वयाच्या १६ व्या वर्षी पाकिस्तान संघात प्रवेश केला. त्यांच्याबद्दल एका प्रश्नावर शोएब अख्तर म्हणाला, ‘माहित नाही, नसीम शाहच्या कमकुवतपणाबद्दल कोणाला माहिती नाही, कोण त्याला क्रिकेटच्या बारकावे शिकवेल. व्हाईट क्रीम लावून कोणीही १६ वर्षांचा होत नाही. आमची माणसे स्वतःची चेष्टा करायला का उतावीळ आहेत? तो नुकताच ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरुन परतला आहे आणि तेथील लोक असे म्हणत आहेत की नसीमचे वय २०, १९ किंवा साडे १९ करून घ्या.

राशिद लतीफ म्हणाले- सचिन आणि लाराची वाटते भीती :
पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतीफ म्हणाले की, “आपल्या देशात गोलंदाजांना न्याय मिळत नाही.” खेळाडू केवळ आकडेवारीवर आधारित लक्षात ठेवतात. स्टीव्ह वॉ आणि शेन वॉर्नचे उदाहरण घ्या. फलंदाज आमच्या गोलंदाजांना घाबरायचे पण इतर देशांच्या गोलंदाजांकडे पाहा. त्याने ६०० किंवा ७०० बळी घेतले आहेत. सईद अन्वर हा एक उत्तम फलंदाज होता. तो इंजमाम आणि युनूस खालपेक्षा चांगला खेळाडू होता पण काय झाले? त्याला ५ ते ६ हजार धावा करता आल्या. आम्हाला सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारापासून जशी भीती वाटत होती त्याचप्रमाणे विरोधी संघ सईद अन्वरला घाबरत होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/