
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची कसोटीत महेंद्रसिंग धोनी दिसणार ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे. विशाखापट्टणममधील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 203 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला तर मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना रांची येथे 19 ऑक्टोबरपासून खेळला जाईल. या सामन्यात घरच्या मैदानावर महेंद्रसिंग धोनी आपली उपस्थिती दाखवू शकतो. आयसीसी विश्वचषक 2019 पासून धोनीने कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात भाग घेतलेला नाही.
महेंद्रसिंग धोनीने 2014 मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत आहे. महेंद्रसिंग धोनी तीन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. भारतीय संघ तिसर्या कसोटी सामन्यासाठी 15 ऑक्टोबरला रांचीला पोहचणार आहे. हा सामना पाहण्यासाठी महेंद्रसिंग धोनी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांना जेव्हा त्यांना महेंद्रसिंग धोनीबद्दल प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनी याबद्दल काही बोलण्यास नकार दिला, परंतु सूत्रांनी माहिती दिली आहे की, महेंद्रसिंग धोनीला आधीपासूनच सामना पाहण्यासाठी आग्रह केला आहे. त्यामुळे धोनी कोणत्याही एका दिवशी सामना पाहण्यासाठी पोहोचू शकतो. आयसीसी विश्वचषक 2019 नंतर महेंद्रसिंग धोनीने वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी आपली अनुपस्थिती दर्शवली आहे.
visit : Policenama.com
- रूबाबदार व्यक्तीमत्वासाठी पुरूषांनी फॉलो करावा ‘हा’ पारंपारिक ‘फॉर्मूला’
- पुरूषांनी ‘या’ १० गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास बिघडू शकते आरोग्य, अशी घ्या काळजी
- ‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी पुरूषांनी ‘हे’ सेवन करावे, अशी आहे पद्धत
- सावधान ! जेवणानंतर थंड पाणी पिताय का ? रोग प्रतिकारकशक्ती होते कमी
- ‘या’ व्यायामाने कर्करोग रूग्णांच्या आयुष्यामानात होतो सकारात्मक बदल
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या
- ‘या’ सेक्ससंबंधीच्या समस्यांपासून ‘कंडोम’ देखील वाचवू शकत नाही, जाणून घ्या
- ‘हे’ व्यायाम प्रकार करा आणि पळवून लावा ‘गुडघेदुखी’ ! जाणून घ्या