21 चेंडूत शतक साजरं करणाऱ्या ‘या’ भारतीय खेळाडूने साऊथ आफ्रिके विरुद्ध ठोकली ‘सेंच्युरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंडर 19 वर्ल्ड कपच्या आधी भारताची युवा टीम साऊथ आफ्रिकेमध्ये चार देशांसोबत वनडे सिरीज खेळत आहे. डरबन येथे पार पडलेल्या सामन्यमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. विकेटकिपर ध्रुव जुरेल ने यावेळी धमाकेदार शतक ठोकले. जुरेल ने डरबनच्या कठीण खेळपट्टीवर 115 चेंडूंमध्ये 101 रन बनवले. त्याचप्रमाणे तिलक वर्माने देखील चांगली कामगिरी करत 70 रण बनवत जुरेलला चांगली साथ दिली आणि भारताने 259 रणांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यांना दिले.

जुरेलचे शतक
डरबन येथे साऊथ आफ्रिकेसोबत सुरु असलेल्या सामन्यांमध्ये भारताची सुरुवात अत्यंत वाईट झाली होती. 13 धावांवर 3 विकेट अशी स्थिती असताना वर्मा आणि जुरेल या जोडीने मोठी भागीदारी केली.दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 164 धावांची भागीदारी केली. यामध्ये जुरेल ने केलेले शतक निर्णायक ठरले.

कोण आहे ध्रुव जुरेल ?
ध्रुव जुरेल आग्रा येथील रहिवासी आहे. त्याचे वडील नेम सिंह जुरेल हे एक सैनिक होत त्यांनी 1999 मध्ये कारगिल युद्ध देखील लढले. 2017 मध्ये जुरेल चांगलाच चर्चेत आला होता. जेव्हा त्याने टी 20 सामन्यामध्ये केवळ 21 चेंडूत शतक ठोकले होते. मुलाने सैन्यात भरती व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती मात्र ध्रुव ने क्रिकेट खेळण्याचे ठरवले. ध्रुव ज्याप्रकारे फलंदाजी करतो त्यावरून त्याचे भविष्य उत्तम असल्याचे दिसते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/