‘डिकॉक’नं 8 सिक्स अन् 2 चौकारच्या मदतीनं 22 चेंडूत 65 रन, तरीही झाला पराभव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जवळजवळ पराभव स्वीकारल्यानंतर इंग्लंडने तीन टी -20 सामन्यांच्या दुसर्‍या सामन्यात दोन धावांनी विजय मिळविला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डीकॉकची तुफानी खेळीसुद्धा संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1 – 1 अशी बरोबरी साधली आहे. डरबन (इंग्लंड) येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 204 धावा केल्या. मात्र टॉम करनच्या अखेरच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये केवळ 203 धावांवर रोखले गेले आणि इंग्लडने सामना जिंकला.

दक्षिण आफ्रिकेसमोर 205 धावांचे लक्ष्य
205 धावांचे टार्गेट करताना दक्षिण आफ्रिकेने जोरदार सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी टेंबा बावुमा आणि कर्णधार क्विंटन डीकॉकने पहिल्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. डिकॉकने 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि 65 धावांवर बाद होण्याआधी आठ षटकार आणि दोन चौकार ठोकले. यानंतर, टेंबा बावुमा देखील 31 धावा करुन माघारी परतला. डेव्हिड मिलर, जेजे स्मट्सने आपल्या छोट्या खेळीसह दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला सहा चेंडूत 15 धावा कराव्या लागल्या. प्रीटोरियस आणि वार क्रीजवर उपस्थित होते. ओव्हरमधील पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर पुढच्या चेंडूवर प्रीटोरियसने षटकार ठोकला.

शेवटच्या ओव्हरचा थरार :
ओव्हरच्या तिसर्‍या बॉलवर त्याने पुन्हा मोठा शॉट खेळला आणि एक चौकार ठोकला. शेवटच्या तीन चेंडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेला पाच धावांची आवश्यकता होती. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर डसे आणि प्रिटोरियस यांनी दोन धावा केल्या. मात्र, यानंतर जेव्हा दोन चेंडूंत तीन धावा आवश्यक होत्या. ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर टॉम करनने प्रिटोरियसला एलबीडब्ल्यू आउट केले. जेव्हा ओव्हरच्या शेवटच्या बॉलला विजयासाठी तीन धावांची आवश्यकता होती, तेव्हा नवीन फलंदाज ने शॉर्ट फाईन लेगवर शॉट खेळला पण आदिल रशीदने झेल घेतला आणि इंग्लंडने दोन धावांनी सामना जिंकला. यापूर्वी टॉस गमावल्यानंतर इंग्लंडच्या संघाने 20 षटकांत सात गडी गमावून 204 धावा केल्या.