ब्रिटीशांच्या जमिनीवर भारतीय मुलींची ‘चमकदार’ कामगिरी, पाडला धावांचा पाऊस !

नवी दिल्ली : इंग्लंडमधील ‘किया सुपर लीग २००१९’ (Kia Super League 2019) मध्ये भारतीय महिला क्रिकेटपटूंनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा या चार भारतीय महिला खेळाडूंचा समावेश होता. यापैकी स्मृती मंधानाच्या टीम वेस्टर्न स्टॉर्मने सलग दुसर्‍या वेळी या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. या संघात तिच्याबरोबर दीप्ती शर्मा देखील होती, जिने अंतिम सामन्यात शानदार खेळी करून संघाला जिंकून दिले. त्याचवेळी हरमनप्रीत कौरची टीम ‘लँकशायर थंडर’ गुणतक्त्यात तळाशी होती आणि जेमिमाचा संघ यॉर्कशायर डायमंड चौथ्या क्रमांकावर होता. परंतु या चौघींनीही या स्पर्धेत आश्चर्यकारक खेळ दर्शविला.

जेमिमाने फलंदाजीत कामगिरी बजावली, तर दीप्तीने बॅट आणि बॉल दोन्हींमध्ये ऑलराऊंडर कामगिरी केली. ‘किया सुपर लीग २०१९’ मध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरी बद्दल आदीम जाणून घेऊया.

स्मृती मंधाना : वेस्टर्न स्टॉर्मन या विजेत्या संघाची ती सदस्य होती. स्मृती तिच्या टीमसाठी प्रथम फलंदाजीस उतरून ओपनिंग करायची. तिने ११ सामन्यात २४.३६ च्या सरासरीने २६८ धावा केल्या. यात २ अर्धशतके ठोकली आहेत आणि २ वेळा शून्यावरही बाद झाली. ७२ धावा ही तिची सर्वोच्च धावसंख्या होती. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ७ व्या स्थानावर होती.

जेमिमा रॉड्रिग्ज : या उदयोन्मुख भारतीय खेळाडूने अप्रतिम फलंदाजी करत सुपर लीगमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. धावांच्या बाबतीत तिने दुसरे स्थान पटकावले. मुंबईची रहिवासी जेमिमाने १० सामन्यांत ५७.२८ च्या सरासरीने ४०१ धावा केल्या. यात तिने एक शतक व दोन अर्धशतके झळकावली. या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या (नाबाद ११२) देखील जेसिकाने केली. सरासरी धावसंख्येच्या बाबतीतही जेमिमाने या स्पर्धेत पहिले स्थान पटकावले. त्याने या स्पर्धेत ५५ चौकार ठोकले आणि या सर्वाधिक चौकारांच्या आकडेवारीत ती डॅनिएल व्हेट नंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे.

दीप्ती शर्मा: ‘वेस्‍टर्न स्‍टॉर्म’ संघाला विजयी करण्यात उत्तर प्रदेशच्या या अष्टपैलू खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने ११ सामन्यांत १०६ धावा केल्या आणि ९ बळी घेतले. अंतिम सामन्यात दीप्तीने २२ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या आणि संघाला लक्ष्य पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली तेव्हा तिने १ विकेटही घेतली. दीप्ती सर्वाधिक धावांच्या सरासरीच्या बाबतीत स्पर्धेत दुसर्‍या स्थानावर आहे. ती ७ डावात ५ वेळा नाबाद होती. यामुळे तिची सरासरी ५३ होती जी जेमिमाच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर होती. तसेच, धावा काढण्याच्या किंवा स्ट्राइक रेटच्या बाबतीत ती तिसर्‍या स्थानावर होती. दीप्तीने १४५.२० च्या स्ट्राईकसह धावा केल्या.

हरमनप्रीत कौर: भारतीय संघाच्या कर्णधार हरमनप्रीतसाठी ही स्पर्धा चांगली होती. तिने १० सामन्यात २९ च्या सरासरीने २६१ धावा केल्या. धावांच्या बाबतीत तिला ९ वे स्थान मिळाले. सुपर लीगमध्ये हरमनप्रीतने २ अर्धशतके केली. तिने २५ चौकार आणि १० षटकार लगावले.

आरोग्यविषयक वृत्त –