Eng vs Pak : ‘हाफिज’ आणि ‘हैदर’ यांनी राखली पाकिस्तानची ‘लाज’, सलग दुसऱ्या मालिकेतील पराभव टळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पहिली कसोटी मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही पराभूत होण्याचा धोका होता. पण मोहम्मद हाफिज आणि हैदर अली यांनी सलग दुसर्‍या मालिकेतील पराभवापासून आपल्या संघाला वाचवले. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा पहिला सामना पावसामुळे टळला आणि दुसरा सामना इंग्लंडने जिंकला. यानंतर, पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानकडे शेवटची संधी होती. मँचेस्टर येथे खेळलेला तिसरा आणि निर्णायक सामना त्यांनी पाच धावांच्या फरकाने जिंकला.

हाफिजची वेगवान खेळी
दुसर्‍या टी-२० सामन्यातही पाकिस्तानच्या संघाने मोठी धावसंख्या केली होती, पण इंग्लंडचा कर्णधार ओयन मॉर्गन आणि मलान यांच्या शतकी भागीदारीने त्यांचा मोठा स्कोर गमावला, पण तिसर्‍या सामन्यात संघाने तो होऊ दिला नाही. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने ४ विकेट गमावून १९० धावा केल्या. मात्र या सामन्यातही पाकिस्तानची अवस्था वाईट दिसत होती. संघाने ३२ धावांवरच फखर जमान आणि कर्णधार बाबर आझमच्या दोन महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या, पण त्यानंतर हाफिज आणि हैदरने १०० धावांची भागीदारी करून संघाला १३२ धावांवर नेले. ५४ धावांवर हैदर अली परतला. यानंतर हाफिजने शादाब खान आणि इमाद वसीम यांच्यासह संघाला निर्धारित ओव्हरमध्ये १९० धावांवर पोचवले. हाफिजने नाबाद ८६ धावा केल्या, त्यामध्ये त्याने ४ चौकार आणि ६ षटकार मारले.

नंतर गोलंदाजांनी सांभाळली जबाबदारी
हाफिज आणि हैदरने फलंदाजी विभाग सांभाळला होता, त्यानंतर स्कोअर वाचवण्याची जबाबदारी गोलंदाजांवर होती. मात्र गोलंदाज थोडे महागच पडले, पण नियमित अंतरावर विकेट घेतल्याने यजमानांच्या धावांवर परिणाम झाला. अखेरच्या षटकात धावांचा वेग खूप मंदावला. इंग्लंडच्या मोईन अलीने सर्वाधिक ६१ धावा केल्या.

त्याच वेळी टॉम बॅथनने ४६ धावा केल्या. कर्णधार ओयन मॉर्गन १० आणि मलान ७ धावांपेक्षा जास्त करू शकले नाहीत. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदी आणि वहाब रियाझने प्रत्येकी दोन, तर इमाद वसीम आणि हॅरिस रऊफ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडचा संघ निर्धारित ओव्हरमध्ये ८ विकेटवर १८५ धावा करू शकला.