…म्हणून ‘टीम इंडिया’च्या फॅन्सनीं रवी शास्त्रींची सोनिया गांधींशी ‘तुलना’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट सल्लागार समितीने रवि शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी पुन्हा एकदा वर्णी लावली आहे. ५७ वर्षीय रवि शास्त्री टी – २० वर्ल्ड कप २०२१ पर्यंत टीम इंडियांच्या मुख्य प्रशिक्षक पदीकायम असतील. टीम इंडियांच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी ६ नावांची यादी तयार करण्यात आली होती. ज्यात सध्याचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या नावाचे देखील समावेश करण्यात आला होता.

रवि शास्त्री शिवाय यादीत लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंह यांची नावे देखील होती. परंतू कपिल देव यांच्या नेतृत्वातील सीएसीची प्रथम पसंती रवि शास्त्री ठरले. या समितीत अंशुमान गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचे नाव देखील सामिल होते. या समितीने पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी रवि शास्त्रीची वर्णी लागली आहे. परंतू हा निर्णय क्रिकेट चाहत्यांना नाराज करणारा ठरला. यासंबंधित ट्विटवर सध्या या निर्णयाला ट्रोल केले जात आहे.

यावर कपिल देव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, रवि शास्त्रींच्या टीम इंडियामध्ये मुख्य प्रशिक्षक पदी वर्णी लावण्यामध्ये विराट कोहलीच्या पसंदीचा प्रश्न उद्भवत नाही. कपिल देव यांनी संगितले की, सर्व उमेदवारामध्ये रवि शास्त्रींचा रेकॉर्ड उत्तम राहिला आहे. त्यांच्या प्रशिक्षक पदी असताना टीम इंडिया रॅकिंगमध्ये नंबर १ वर राहिली आणि याचमुळे ७१ वर्षांनंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत केले.

परंतू शास्त्रीच्या प्रशिक्षक पदी असताना भारताने आयसीसी टूर्नामेंटमध्ये यश मिळवले नव्हते. याशिवाय २०१५ आणि २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या हाती निराशा आली होती. परंतू समितीने या कारणांकडे दुर्लक्ष केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like